सटाण्यात दोन नराधमांचा अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

रोशन खैरनार
रविवार, 14 जानेवारी 2018

सटाणा - येथील पिंपळेश्वर रोडवरील आराई पांदीलगत शेतमळ्यात घरात कुणी नसल्याचा फायदा घेत दोन नराधमांनी लहान बहिणींचे हातपाय बांधून पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी शाम सुरेश पवार आणि विलास बापू साताळे या दोन्ही नराधमांना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सटाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पिडीत तरुणीचे आई - वडील आराई पांधी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काल शनिवार (ता.१३) रोजी आठवडे बाजार असल्याने दुपारी दोनच्या सुमारास पिडीत मुलीची आई आपल्या दोन लहान व एका पंधरा वर्षीय मुलीला घरी थांबवून बाजाराला गेली होती. दरम्यान, पिडीत मुलीवर गेल्या काही दिवसांपासून नजर असलेल्या शाम सुरेश पवार आणि विलास बापू सताळे या दोन तरुणांनी मुलीची आई बाजारात गेल्याचे पाहून त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पिडीत मुलीच्या दोन्ही लहान बहिणींचे हात पाय बांधून तोंड दाबले. आणि आवाज केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने दोन्ही लहान मुली घाबरून गेल्या. याचवेळी दोन्ही आरोपींनी पंधरा वर्षीय मुलीला घरातील आतील खोलीत ओढून नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला व दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर मुलीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्यांना घडलेला प्रकार समजल्यावर त्यातील एका शेतकऱ्याने पिडीत मुलीच्या भावाला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. व सटाणा पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: satana news rape on girl