सटाण्यात पूर्ववैमनस्यातून दोन मुस्लिम गटांत दंगल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

सटाणा (जि. नाशिक) - सटाणा शहरात मुस्लिम समाजाच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून आज येथील जामा मशिदीसमोर दंगल उसळली. दोन्ही गटांनी सर्रासपणे लाठ्याकाठ्यांचा केलेला वापर व दगडफेक, यामुळे सात जण गंभीर तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

येथील मुस्लिम समाजातील शेख व मुल्ला या दोन गटांत वर्चस्वासाठी पूर्वीपासूनच तणावाचे वातावरण आहे. आज दुपारी नमाज पठणानंतर जामा मशिदीसमोर शेख व मुल्ला गटातील युवकांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसन भीषण हाणामारीत झाले. पूर्वनियोजित कटाप्रमाणे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण सुरू केली. मशिदीसमोरील टिळक रोडवर दगडविटांचा व चपलांचा खच तयार झाला होता. अचानक उसळलेली ही हाणामारी पाहून मशिदीसमोरील सर्वच व्यापारी व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद केली. या घटनेचे वृत्त समजताच पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केल्याने दंगलखोरांनी आजूबाजूच्या गल्लीबोळात पळ काढला. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी घटनास्थळी तैनात केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: satana news two muslim group riot in satana