सटाण्यात मंदिरांमध्ये घुमला रामनामाचा गजर...

ramnavmi.
ramnavmi.

सटाणा - शहर व परिसरात प्रभू रामजन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर, बालाजी मंदिर, महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिरांत आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. विविध सार्वजनिक मित्रमंडळांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

महात्मा गांधी रोडवरील अहिर सुवर्णकार समाजाच्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाचा परंपरेनुसार मुख्य कार्यक्रम साजरा झाला. सकाळी सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नागरिक अशोक वानखेडे, सौ. मालती वानखेडे व दत्तात्रय जाधव, सौ.उषा जाधव यांच्या सपत्नीक हस्ते श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मुर्त्यांचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. श्रीरामजन्मोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. 

बापू पाठक यांनी प्रभू श्रीरामांची ‘दुनिया चले श्रीराम के बिना’, ‘खेती करो हरी नाम की’, ‘रामजी की निकली सवारी’ आदी भजने सादर केली. दुपारी बारा वाजता मंदिरात श्रीरामजन्मोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी महिला मंडळाने प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवासाठी तयार केलेल्या पाळण्याची दोरी ओढून विविध पाळणागीते व भावगीते सादर केली. उपस्थित शेकडो भाविकांनी श्रीरामाच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत श्रीराम जयजयकाराच्या घोषणा दिल्या.  

यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,  उपाध्यक्ष यशवंत जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला जाधव, भिकाशेठ जाधव, राहुल जाधव, भालचंद्र दंडगव्हाळ, कल्पेश जाधव, अविनाश विसपुते, नंदकुमार विसपुते, मंदाकिनी अमृतकार, रेणुका जाधव, विजया जाधव, रेखा विसपुते, मीनाक्षी जाधव, पूनम जाधव, सोनाली जाधव, संजय जाधव, प्रमोद जाधव, बापू जाधव, दि.शं.सोनवणे, रवींद्र मोरे आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

पिंपळेश्वर मित्रमंडळ व संदीप देवरे मंडळातर्फे आज श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळातर्फे आज पहाटे पाच वाजता श्रीक्षेत्र दोधेश्वर ते पिंपळेश्वर अशी पायी कावडयात्रा काढण्यात आली. सकाळी आठ वाजता ऍड. महेश देवरे व सौ. सोनाली देवरे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली. भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता पिंपळेश्वर येथून सजविलेल्या ट्रक्टरवर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विविध धार्मिक गीतांवर भाविकांनी नृत्य केले. यावेळी संदीप देवरे, महेंद्र खैरनार, धनंजय सोनवणे, गोरख सोनवणे, नितीन अहिरे, शाम कायस्थ, रमेश पारख, बबलू पगार, राकेश सोनवणे, देविदास सोनवणे, योगेश जाधव, राहुल ठाकरे, सजन सोनवणे, विकी सोनवणे, रोहित सोनवणे, प्रभाकर जगताप, शेखर बोरसे, नंदकिशोर निमकर्डे, पियुष गोसावी आदी भाविक उपस्थित होते.

जय भद्रा ग्रुप
शहरातील जय भद्रा ग्रुप व मुन्ना खैरनार मित्र मंडळातर्फे दोधेश्वर नाक्यावरील (कै.) पंडितराव धर्माजी पाटील चौकात भव्य व्यासपीठावर श्रीरामांची मूर्ती सजवून ठेवण्यात आली होती. नगरसेवक राकेश खैरनार यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मंडळातर्फे भाविकांना हनुमान चालीसा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मुन्ना खैरनार, हर्षल सोनवणे, निखील देवरे, रवी सोनवणे, ललित खैरनार, मंगेश खैरनार, संदीप खैरनार, गणेश भदाणे, सागर पवार, मनीष अहिरे, धीरज सोनवणे, सुमित अहिरे, सचिन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com