सटाणा येथुन पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी सटाणा शहर शिंपी समाजाच्या संत नामदेव महाराज सेवा ट्रस्ट तसेच महिला व नवयुवक मंडळातर्फे खाद्य पदार्थाची पाकिटे, धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे आदी साहित्य एका टेम्पोतून मदत स्वरुपात देण्यात आली. 

सटाणा : सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी सटाणा शहर शिंपी समाजाच्या संत नामदेव महाराज सेवा ट्रस्ट तसेच महिला व नवयुवक मंडळातर्फे खाद्य पदार्थाची पाकिटे, धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे आदी साहित्य एका टेम्पोतून मदत स्वरुपात देण्यात आली. 

शहरातील स्वराज्य प्रतिष्ठाण कसमादे आणि दिव्य बागलाण प्रतिष्ठाण यांच्यातर्फे सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी शहरवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील शिंपी समाजाच्या संत नामदेव महाराज सेवा ट्रस्ट, महिला आघाडी व नवयुवक मंडळातर्फे आज पूरग्रस्तांसाठी एका टेम्पोतून मदत देण्यात आली.

शिंपी समाजाध्यक्ष मोहन कापडणीस यांनी स्वराज्य प्रतिष्ठाण कसमादेचे संस्थापक आणि नगरसेवक राहुल पाटील, दिव्य बागलाण प्रतिष्ठाणचे मयूर सोनवणे, शरद कापुरे आदींसह महिला पदाधिकारी, युवक व समाजबांधव उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satana residents send help to flood survivors