Satyajeet Tambe | जुन्या पेन्शन साठी आग्रही : सत्यजित तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe | जुन्या पेन्शन साठी आग्रही : सत्यजित तांबे

शहादा (जि. नंदुरबार) : मी अपक्ष आहे आणि अपक्षच राहणार असून, सरकारी (Govt) कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी मी अतिशय आग्रही आहे. विधान परिषदेमध्ये पहिल्या चर्चेत तो मुद्दाही मांडला आहे. (satyajeet tambe statement about old pension scheme nandurbar news)

मला खात्री आहे राज्य सरकार व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यातून चांगला मार्ग काढतील. याप्रश्नी निश्चितच सरकारवर दबाव आणण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. सत्यजित तांबे यांनी पत्रकारांना सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी नुकतीच शहादा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी भेट देत मतदारांचे आभार मानले. या वेळी त्यांनी पदवीधरांचे व शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचेही आश्वासित केले.

गंगोत्री येथे भेट

या वेळी आमदार सत्यजित तांबे यांनी शहाद्याचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या गंगोत्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश पटेल, लोकशाही आघाडीचे अजबसिंग गिरासे, अंबालाल पाटील, घनश्याम पाटील, तसेच शहादा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सदस्य व लोकशाही आघाडीच्या सदस्यांसह विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

महाराणा प्रतापसिंह स्मारकास भेट

शहरातील श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. या वेळी शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे आमदार सत्यजित तांबे यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत, उपाध्यक्ष किशोरसिंग गिरासे, कार्याध्यक्ष कोमलसिंग गिरासे, सचिव गोविंदसिंग गिरासे, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, संचालक देवेंद्रसिंग राजपूत, भटसिंग गिरासे, अजबसिंग गिरासे, डॉ. प्रेमसिंग गिरासे, देवेंद्रसिंग गिरासे याव्यतिरिक्त मराठा महासंघाचे श्याम जाधव, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम, रवींद्र मराठे, राजू माळी, भिका महाजन आदी उपस्थित होते.