
रणजी स्पर्धेतील पहिली लढत सोमवारी (ता. 9) हरियाना येथील लाहली येथे यजमान हरियाना संघासोबत होणार आहे. सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील निवडीमुळे जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींनी सत्यजितचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावची यंदाही महाराष्ट्र संघातर्फे रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.
1934 पासून अतिशय महत्त्वाची ही प्रथम श्रेणी क्रिकेटची रणजी करंडक स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित केली जाते. या स्पर्धेचा 2019-20 हा 86 वा हंगाम आहे.
विजय हजारे, मुश्ताक अली स्पर्धेतील कामगिरीची दखल;
गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, तसेच यावर्षी विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर सत्यजित महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज बनला आहे. सत्यजितने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत सहा सामन्यांत 14, तर सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत अकरा सामन्यांत 15 बळी घेतले. तसेच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत आपला वाटा उचलत आहे. तसेच गेल्यावर्षी आयपीएल लिलावामध्ये सत्यजित वर बोली लागली नाही. त्यामुळे मागील वर्षी सत्यजितची संधी हुकली. पण यंदा सत्यजितच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निश्चितच आयपीएलचे एखाद्या संघांमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.
हरियाणाच्या सामन्यांकडे लागले लक्ष
रणजी स्पर्धेतील पहिली लढत सोमवारी (ता. 9) हरियाना येथील लाहली येथे यजमान हरियाना संघासोबत होणार आहे. सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील निवडीमुळे जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींनी सत्यजितचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ "लखोबा लोखंडे"...अखेर झाला जेरबंद...
हरियाणा विरुद्धच्या सामन्यासाठी निवडलेला महाराष्ट्र संघ असा..
नौशाद शेख (कर्णधार), अंकित बावणे, ऋतुराज गायकवाड, स्वप्नील गुगळे, चिराग खुराणा, विशांत मोरे (यष्टिरक्षक), राहुल त्रिपाठी, अजिम काजी, सत्यजित बच्छाव, जगदीश झोपे, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, दिग्विजय देशमुख.
हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...
एलिट गटातील सामने असे...
एलिट गटातील गट "क'मध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाचे पुढील सामने जम्मू आणि काश्मीर (17 डिसेंबर), छत्तीसगड (25 डिसेंबर), सेना दल (3 जानेवारी), झारखंड (11 जानेवारी), आसाम (19 जानेवारी), त्रिपुरा (27 जानेवारी), ओडिशा (4 फेब्रुवारी) आणि उत्तराखंड (12 फेब्रुवारी) अशी नऊ संघांशी लढत होणार आहे.
हेही वाचा > PHOTOS : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना पकडले...'या' पोलीस ठाण्याची चौथी घटना..