२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला विभागाकडून 'संविधान बचाओ.. देश बचाओ'चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.

नाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला विभागाकडून 'संविधान बचाओ.. देश बचाओ'चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी दिली आहे.

सरकारच्या विरोधात सर्व समाज रस्त्यावर येत आहे. सरकारकडे कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. नोटाबंदी व विविध निर्णयामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. माहिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. लोकशाहाची कोणताही स्तंभ सुरक्षित नाही. सरकार गुंडगिरीलाच शाब्बासकी देत आहे. यांचा विरोध करण्यासाठी 'संविधान बचाओ.. भारत बचाओ' हा कार्यक्रम देशभर घेतला जात आहे. या कार्यक्रमाची सुरवात दिल्ली येथून झाली असून त्यानंतर मुंबई, नागपूर  येथे आंदोलन करण्यात आले आहे. आता राज्यात सर्व ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन मनुस्मृती व इव्हीएम मशिनची होळी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे संविधान बचाओ-भारत बचाओ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ, यांच्यासह प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केले आहे.

Web Title: Save the Constitution & Save India Rally on August 23