२२ वर्षाच्या तपश्चर्येला २२ दिवसांत मिळाले फळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

येवला - गेले २२ वर्ष झपाटल्यागत काम करुन राजकीय वाटचाल करत दराडे बंधूच्या तपश्चर्येला २२ दिवसांत फळ मिळाले. दोघे बंधू जादूची कांडी फिरावी तसे आमदार झाल्याने महाराष्ट्रात येवल्याला हे भाग्य लाभले असून नवा इतिहास रचला गेला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत मायबाप जनतेच्या सुख दुःखात समरस व्हा.समाजसेवेची चाड असू द्या, असा हितोपदेश आमदार मारोतराव पवार यांनी केला.

येवला - गेले २२ वर्ष झपाटल्यागत काम करुन राजकीय वाटचाल करत दराडे बंधूच्या तपश्चर्येला २२ दिवसांत फळ मिळाले. दोघे बंधू जादूची कांडी फिरावी तसे आमदार झाल्याने महाराष्ट्रात येवल्याला हे भाग्य लाभले असून नवा इतिहास रचला गेला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत मायबाप जनतेच्या सुख दुःखात समरस व्हा.समाजसेवेची चाड असू द्या, असा हितोपदेश आमदार मारोतराव पवार यांनी केला.

दोन्ही बंधू आमदार झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे या दोघा बंधूंचा नागरी सत्कार सावरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी लोकनेते माजी आमदार मारोतराव पवार होते.यावेळी त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली.यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, कृषीरत्न पुरस्कारप्राप्त मच्छिंद्र पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिवसेनेच्या दमदार वाटचालीचा इतिहास सांगून दोन आमदार मिळाल्याने शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना आणखी गती मिळेल अशी भावना व्यक्त केली.२००४ नंतर स्थानिक माणसाच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.यापुढेही येथील राजकारणात अनेक स्थित्यंतरे दिसतील असे सांगत आगामी विधानसभेचा किंगमेकर आपणच असणार आहे.सावज टप्प्यात आल्याशिवाय गोळी झाडायची नाही.हा माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या शब्दाची आठवण आजही असल्याचे जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

१९९९ मध्ये केवळ १२९ मतांनी पराभव झाल्याने वेड्यासारखेच काम केले.म्हणूनच ध्यास पूर्ण झाला. यासाठी माणिकराव शिंदे, संभाजीराजे पवार, लोकनेते मारोतराव पवार यांच्यासह तालुक्याचा मोठा वाटा आहे. अनेकांची समर्थ साथ लाभली यामुळे सर्व काही शक्य झाले. दिलेले शब्द पाळण्यासाठी काम करणार आहोत असे दराडे बंधू सत्काराला उत्तर देतांना म्हणाले.डॉ.सुरेश कांबळे, साहेबराव सैद यांनी दराडे बंधूप्रमाणे उद्धव ठाकरेनी सहावा बंधू म्हणून संभाजीराजे पवार यांचा हात घट्ट धरावा अशी भूमिका मांडली.अजीज शेख,रतन बोरणारे यांची भाषणे यावेळी झाली.यावेळी साखरचंद साळवे, डॉ.सुधीर जाधव, अरुण काळे, वाल्मिक गोरे, दिलीप मेंगाणे, प्रसाद पाटील, छगन आहेर, प्रवीण गायकवाड, सविता पवार, मंगेश भगत, कविता आठशेरे, संजय पगारे, भाऊसाहेब गरुड आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबुराव सोनवणे यांनी केले.

Web Title: Sawargaon MLA Darade Bandhu