तीन विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत देणार शिष्यवृत्ती

एल. बी. चौधरी
रविवार, 3 जून 2018

(कै). शकुंतला हुंबड हे स्वातंत्र्य सैनिक हरेश्वर पिंपळगाव येथील रहिवासी (कै.) मगनलाल तानाजीसा जैन यांच्या कन्या होत्या. श्री. जैन यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी धुळ्यातील जेलमध्ये तुरुंगवास भोगला आहे. पती (कै.) गेंदीलाल मगनलाल हुंबड हे प्रख्यात डॉक्टर होते.

सोनगीर (जिल्हा धुळे) : येथील शकुंतला गेंदीलाल हुंबड यांच्या नुकतेच निधन झाल्याने त्यांचा मुलगा व मुंबईच्या डॉर्श कन्सल्टींग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निर्मलकुमार हुंबड यांनी यंदा पासून दरवर्षी येथील विद्यालयात दहावीत मंडळाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या तिघांना बारावीपर्यंत म्हणजे दोन वर्षे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर त्यांना शिक्षणासाठी अन्य मदतही केली जाणार आहे. 

(कै). शकुंतला हुंबड हे स्वातंत्र्य सैनिक हरेश्वर पिंपळगाव येथील रहिवासी (कै.) मगनलाल तानाजीसा जैन यांच्या कन्या होत्या. श्री. जैन यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी धुळ्यातील जेलमध्ये तुरुंगवास भोगला आहे. पती (कै.) गेंदीलाल मगनलाल हुंबड हे प्रख्यात डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात दुष्काळ व प्लेगच्या साथीत गोरगरीब जनतेवर उपचारासाठी   रेडक्रॉसतर्फे दोनदा बंगालमध्ये गेले होते. एकदा वर्धा येथे गांधीजींची भेटही घेतली होती. त्यामुळे (कै.) शकुंतला हुंबड यांच्यावर जन्मतःच जनसेवेचा ठसा उमटला होता. त्यानुसार त्यांनी शक्य तिथे शक्य तशी मदत केली. शिक्षणाविषयी त्यांना विशेष आवड असल्याने त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. म्हणूनच त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय खानदेशातील मातीत जन्म घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचे मार्गदर्शन खानदेशातीलच होतकरू युवकांना मिळावे यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहे.

(कै.) शकुंतला हुंबड यांच्या संस्कारामुळेच नातू अभिषेक हुंबड यांची अशिया खंडातील सर्वोत्कृष्ट तीस युवकांची यादीत फोर्ब्सने निवड केली होती. तर नात 
स्वाती हुंबड हिने गरोदरपणात होणाऱ्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी एक अॅप तयार करून जगभर नाव कमविले आहे. खानदेशात असे अनेक हीरे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करुन उच्च पदावर पोहचविण्यासाठी मी कार्य करणार असे निर्मलकुमार हुंबड यांनी सांगितले.

Web Title: scholarship for students in Songir