Dhule News : पावसामुळे नागझिरीत शाळेचे नुकसान | School damage in Nagziri due to rain Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad delegation present during the inspection of rain-damaged school.

Dhule News : पावसामुळे नागझिरीत शाळेचे नुकसान

Dhule News : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त नागझिरी (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला जिल्हा परिषदेच्या पदाधिकऱ्यांनी भेट दिली.

जिल्ह्यात ४ जूनला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषदेच्या नागझिरी येथील दोन वर्गखोल्यांचे पत्रे उडाले. (School damage in Nagziri due to rain Dhule News)

त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती महावीरसिंह रावल, कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य लताबाई वसंत पवार, साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, गटविकास अधिकारी सोनवणे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, उपअभियंता साबळे यांच्यासह विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत शाळेला तत्काळ भेट दिली. पदाधिकऱ्यांच्या या संवेदनशीलतेमुळे नागझिरी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शाळा सुरू होण्याच्या सुरवातीलाच वादळी वाऱ्यामुळे नागझिरी येथे शाळाखोल्यांचे पत्रे उडाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अभियंता अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपाध्यक्षांसह सर्व सभापतींशी बैठकीत चर्चा केली.

त्यात शाळेला भेट देण्याचे ठरले. जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका उच्चस्तरीय बैठकीतील सहभागामुळे दौऱ्यावर येता आले नाही.

बांधकाम विभागाचे उपअभियंता साबळे यांना तत्काळ अंदाजपत्रक तयार करून शाळा सुरू होण्याच्या आत वर्गखोल्या दुरुस्तीची सूचना देण्यात आली.