धुळे मनपा क्षेत्रातील शाळा ७ मार्चपर्यंत बंद  ​

धुळे मनपा क्षेत्रातील शाळा ७ मार्चपर्यंत बंद   ​

धुळे : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व काही शाळा-महाविद्यालयांमध्येही कोरोनाबाधित आढळल्याने महापालिका क्षेत्रातील पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, दहावी व बारावीचे वर्ग मात्र मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सुरू राहतील. 


धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. जिल्ह्यात गुरुवारी  तब्बल ९३ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. बाधितांमध्ये धुळे शहरातील संख्याही जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालये सुरू ठेवायचे की बंद करायचे, याबाबतचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेण्याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी निर्देश दिले होते. त्यातच शहरातील काही शाळा-महाविद्यालयांमध्येही कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळल्याने शाळा व्यवस्थापनासह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. 
गुरुवारी  जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एकाचवेळी तब्बल १३ शिक्षक-कर्मचारी बाधित आढळल्याने चिंतेत भर पडली. त्यामुळे गुरुवारीच सायंकाळी महापालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मनपा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला. 

दहावी-बारावी सुरू 
दरम्यान, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असल्याने व पूर्वपरीक्षा, बोर्डाच्या परीक्षेची तयारी आदींबाबत तयारी सुरू असल्याने हे दोन्ही वर्ग सुरू ठेवण्याचा बैठकीत निर्णय झाला. हे वर्ग भरवताना मात्र कोरोनाच्या अनुषंगाने शासन-प्रशासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com