'सीसीटीव्ही' च्या निगराणीत मेहुणबारे शाळेचा परिसर

दीपक कच्छवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मेहुणबारे (जळगाव) : येथील गिरणा प्रसारक मंडळाच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेने सीसीटीव्ही' कॅमेरे  बसविले आहेत. यासाठी मुख्याध्यापक कार्यालयात कॅमेर्‍यातील चित्रण दिसणार आहे. यामुळे शाळेच्या आवारात रोडरोमिओंच्या होणार्‍या उपद्रवाला आळा बसणार असुन वर्ग सोडुन आवारात फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा हायस्कूलमध्ये 974 मुली 871 मुले आहेत. त्यांना 32 शिक्षक व 14 शिक्षिका ज्ञानदानाचे काम करीत असतात. गिरणा हायस्कुलचे अध्यक्ष आबासाहेब साळुखे, क्रमोदीन काझी,प्रकाश साळुंखे हीलाल सोनवणे, प्रभाकर निकम संतोष पवार,यांनी या संदर्भात  निर्णय घेतला होता.या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. शाळा सुटल्यावर टावाळखोर मुले मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

बऱ्याचदा बदनामीच्या भीतीमुळे असा प्रकार घडल्यानंतर तक्रार देत नव्हत्या.शाळेच्या आवारात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेमुळे कोण काय करीत आहे. हे प्राचार्य पी.एन.येवले यांच्या खोलीत  दिसणार आहे.शाळेची सुमारे  13 एकरजागा सीसीटीव्हीच्या निगराणीत आली  आहे.सध्या शाळेत एकुण  सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन दोन कॅमेरे शिक्षकांच्या रूममध्ये  बसविले आहे.त्यामुळे सहाजिकच शिक्षकांना देखील शिस्त लागणार आहे.शाळेत अकरावी बारावीच्या  विद्यार्थ्यांना शाळा भरतांना व सुटतांना 'थंम्ब' यंत्रावर बोट ठेवावे लागते. त्यामुळे गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्राचार्य पी.एन.येवले यांनी  सांगितले.

प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे गरजेचे झाले आहे. यासाठी खरेतर शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. जेणेकरुन विद्यार्थ्यांची सुरक्षा शिक्षकांवर नियंत्रण राहील व शाळेला शिस्त लागेल.
- बाळासाहेब देशमुख, शालेय शिक्षण सभापती, गिरणा हायस्कूल मेहुणबारे

Web Title: school in mehunbare under control by cctv