दुष्काळस्थितीमुळे सुटीतही शालेय पोषण आहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कापडणे - धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्‍याचा अपवादवगळता सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. पंच्याहत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक महसुली गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आहे. कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शाळांमध्ये उन्हाळी सुटीतही पोषण आहार शिजू लागला आहे. विद्यार्थी सुटीतही जेवणासाठी येऊ लागले आहेत. बालकांचे दुष्काळातही पोषण होत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. यंदा पोषण आहार शिजणार का? याकडे पालकांचे लक्ष लागून होते. 

दुष्काळग्रस्त गावे
धुळे तालुक्‍यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. निम्म्यापेक्षा अधिक महसुली गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आहे. यात महिंदळे, भोकर, वलवाडी, खेडे, सुट्रेपाडा, मोराणे, कुंडाणे, वार, उडाणे, सांजोरी, नकाणे, फागणे, रावेर, अवधान, निमडाळे, गोंदूर, बाळापूर, अजंग, नगाव, नवलनगर, वणी, अंबोळे, मळाणे, बिलाडी, न्याहळोद, सातरणे, धनूर, देवभाने, सोनगीर आदी गावांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्‍यातील सर्व तर साक्रीमधील एकशे पंचवीस गावांमध्ये पोषण शिजत आहे. शिरपूरमधील आणेवारी पन्नासपेक्षा अधिक आहे. एकाही गावाचा समावेश नाही.

पोषण आहाराची तरतूद
कमी पैसेवारी गावांतील शाळांमध्ये उन्हाळी सुटीतही पोषण आहार शिजविला जातो. तेथील बालकांचे दुष्काळातही पोषण होत असते. मागील वर्षीही पोषण आहार शिजविला जात होता. गुरुजींनी वितरण केला होता. दरम्यान, काही गावांतील पालकांनी लेखी दिल्याने पोषण शिजविणे बंद असल्याचे समजते, तर काही शिक्षकांनी स्वयंपाकी अर्थात आहार शिजविणाऱ्याकडे जबाबदारी सोपविली आहे. दुष्काळी स्थितीमुळे बऱ्याच पालकांना स्थानिक रोजगार नाही. परीक्षा संपल्याबरोबर रोजगारासाठी स्थलांतर झाले आहे. तर गावी विद्यार्थी गेले आहेत. अशा स्थितीतही पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे.

Web Title: school nutrician food in holiday by drought condtition