नांदूरमधमेश्‍वरमध्ये स्कॉटलंडचे ‘पाहुणे’

आनंद बोरा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात स्कॉटलंडच्या पश्‍चिमेकडील किनारपट्टीवर आढळणाऱ्या पांढऱ्या शेपटीच्या गरुडाचे आगमन झाले आहे. त्याला पाहण्यासाठी देशातील पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार नाशिकमध्ये दाखल झालेत. काही परदेशी पर्यटकांचाही त्यात समावेश आहे.

युरोपमध्ये आढळणारा हा गरुड ‘एसीपिट्रिडेड’ कुटुंबातील आहे. ज्यात हॉक, पतंग आणि हरिअरसारख्या इतर दुर्मीळ शिकारी पक्ष्यांचा समावेश आहे. जपानच्या होक्काइडोच्या पूर्वेकडे ग्रीनॅंड आणि आइसलॅंडच्या पश्‍चिमेला हे पक्षी प्रजनन करतात. या पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होते आहे. मानवनिर्मित रासायनिक घटकांमुळे विषबाधा आणि नैसर्गिक घडामोडींमुळे १९५० च्या दशकापासून या गरुडाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. त्यामुळे ही गरुडाची जात अनेक देशांत लुप्तप्राय अथवा विलुप्त मानली गेली. गरुड वर्षभरात बहुतेक वेळा खुल्या पाणतळाजवळ राहतात. ज्यात खारे पाणी आणि आंतर्देशीय ताजे पाणी या दोन्ही समाविष्ट आहेत. 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अभ्यासक नंदकिशोर दुधे यांच्या ‘टीम’ने काही दिवसांपूर्वी नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्याला भेट दिली होती. त्या वेळी हा पक्षी दिसला होता. त्याचा अभ्यास केल्यावर तो पांढऱ्या शेपटीचा गरुड असल्याची माहिती पुढे आली.
- अमोल दराडे, पक्षी अभ्यासक

Web Title: Scotland Bird in Nandurmadheshwar