35 मीटर पाण्याखाली 'स्कुबा डायविंग'

scuba
scuba

जळगाव : "स्कुबा डायविंग' हा "अंडरवॉटर डायविंग'चा एक प्रकार. जेथे डायव्हर एक अंतर्निहित अंडरवॉटर श्‍वास उपकरण (स्कुबा) वापरून पाण्याखाली स्थिर राहण्यासाठी पृष्ठभागापर्यंत पोहोचत असतो. यात पाण्याचा दबाव नियंत्रित करणे महत्त्वाचे असून, हा कठीण "स्कुबा डायविंग'चा खेळ अंदमान 35 मीटर पाण्याखाली जाऊन पूर्ण करण्याची कामगिरी सातोद (ता. यावल) येथील रोहित महाजन या "एमबीए'चे करणाऱ्या तरुणाने केली असून, आता शार्कसोबत "स्कुबा' करण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून आहे. 

मुंबईत वास्तव्यास असलेल्या सातोदचा रोहित नितीन महाजन सध्या इव्हेंट मॅनेजमेंटमधून "एमबीए' करीत आहे. काही वेगळे करण्याची नेहमीच धडपड असलेल्या रोहितने शालेय जीवनापासूनच ट्रेकिंगला सुरवात केली. यानंतर रिव्हर आऊटिंग, बंजी जम्प, टॉम क्‍लायविंग, टॅपलिंग, फ्लाइंग फॉक्‍स, बया ब्रिज यासारखे धाडसी आणि सर्वसामान्यांना अशक्‍य वाटणारे स्टंट पूर्ण केले. वडील नितीन महाजन व आई सीमा महाजन यांचाही तितकाच सपोर्ट राहिला. आई-वडिलांच्या सपोर्टमुळेच हे शक्‍य झाल्याचे रोहित सांगतो. जळगावातील "पंकज टीव्हीएस'चे पंकज चौधरी यांचा रोहित भाचा आहे. 

"स्कुबा'त पहिलाच प्रयत्न यशस्वी 
स्कुबा डायव्हर प्रामुख्याने पायाला जोडलेल्या पंखांचा वापर करून पाण्याच्या पृष्ठभागावर फिरतात. "स्कुबा डायविंग' करताना एक अंतर्निहित अंडरवॉटर श्‍वास उपकरण (स्कुबा) वापरून पाण्याखाली जाण्याची कामगिरी करावी लागते. हे करताना बऱ्याचदा कानाला जोरदार दणका बसून कायमचा बहिरेपणा येण्याची शक्‍यता असते. हीच बाब रोहितला पहिल्यांदा "स्कुबा डायविंग' करताना आली होती. परंतु जास्त समस्या उद्‌भवली नाही. "स्कुबा'साठी आवश्‍यक आठ दिवसांचा कोर्स पूर्ण केला. या कोर्सदरम्यान आठ ते बारा मीटरच्या खोली जलतरण तलावात "स्कुबा डायविंग'चे प्रॅक्‍टिकली ट्रेनिंग घेतले. यानंतर थेट अंदमानात जाऊन 35 मीटर खोल जाऊन डायविंग करण्याची यशस्वी कामगिरी याच वर्षी पूर्ण केली. साधारण 30 मिनिटे पृष्ठभागाशी राहून पाण्याचा पडणारा दबाव मेंटेन करण्यात यशस्वी ठरला. 

आठवीत असतानाच ट्रेकिंग 
शालेय शिक्षण घेताना वेगळ्या खेळात जायचे रोहितने ठरविले होते. याची सुरवात ट्रेकिंगपासून केली. आठवीत असतानाच रोहितने ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेण्यास सुरवात केली. यानंतर दहावीत गेल्यावर मनाली येथे 14 हजार सी-लेव्हलमध्ये पहिली ट्रेकिंग पूर्ण केली. यानंतर धर्मशाळा व सह्याद्री येथेही ट्रेकिंग केली. 

85 मी. उंचीवरून बंजी जम्प अन्‌ रिव्हर आपटींग 
साध्या दुमजली इमारतीवर उभे राहिल्यानंतर अनेकांना धडकी भरते. परंतु रोहितने ऋषिकेश येथे 85 मीटर उंचीवरून बंजी ड्राइव्ह करण्याची कामगिरी एकदा नव्हे, तर तीन वेळा केली आहे. इतकेच नव्हे, तर दहावीनंतर तीन वेळा ट्रेकिंग यशस्वी झाल्यानंतर उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेश येथे गंगा नदीत चार वेळा रिव्हर आपटींग करण्याची कामगिरीही केली आहे. यासोबतच रॅपलिंग, फ्लाइंट फॉक्‍स, बयाब्रिज, फोटोग्राफी यामध्येही आपला ठसा उमटविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com