पॉर्नसाइट्‌स पाहून उच्चशिक्षित झाला विकृत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक - एमसीएचे शिक्षण घेत असतानाच पॉर्नसाइट्‌स पाहण्याच्या व्यसनामुळे अटक करण्यात आलेला लातूरचा संशयित विकृत झाला.

नाशिक - एमसीएचे शिक्षण घेत असतानाच पॉर्नसाइट्‌स पाहण्याच्या व्यसनामुळे अटक करण्यात आलेला लातूरचा संशयित विकृत झाला.

त्यातूनच त्याने सोशल साइटवर मुलींच्या नावाने खाती उघडून त्यावरून तो मुलींशी अश्‍लील संवाद साधणे, व्हिडिआ कॉल करून अश्‍लील वर्तन करत असल्याचे नाशिक सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले. विश्‍वजित प्रकाश जोशी (26, रा. अवंतीनगर, लातूर) असे संशयिताचे नाव आहे. गेल्या मे 2017 मध्ये त्याच्याविरोधात आयटी कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तिडके कॉलनीतील पीडित युवतीला संशयित विश्‍वजित जोशी याने सोनल शितोळे या बनावट फेसबुक अकाउंटवरून अश्‍लील संदेश पाठविले होते. सोनल जमाल या दुसऱ्या बनावट अकाउंटवरूनही अश्‍लील संदेश, व्हिडिओ पाठविले होते.

Web Title: Seeing pornesites was highly educated and distorted crime