जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव - आयुक्त निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

जळगाव - महापालिकेच्या चार प्रभागांत मालमत्ता कराच्या थकबाकीदार असलेल्या हजार मिळकती वसुली विभागाने मोहीम घेऊन जप्त केल्या. या जप्त मिळकतींचा लिलाव लवकरच केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.

महापालिकेची २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ४३ कोटींची मागणी होती. त्यापैकी ३३ कोटींची वसुली झाली. तर गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता थकीत असलेल्या २८ कोटी पैकी १२ वसुली केली. तर एक हजार मिळकती महापालिकेच्या वसुली विभागाने जप्त केल्या. 

या जप्त केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव केला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

नागरिकांना संगणकीकृत बिले 
शहरातील मालमत्तांचे महापालिकेने स्थापत्य कन्सल्टन्सीकडून घरोघरी जाऊन, तसेच ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले. प्रभागनिहाय डाटा एन्ट्रीचे काम सुरू असून, मालमत्ता कराची संगणकीकृत बिले लवकरच वितरित करण्यात येणार आहे. तर पाणीपट्टी आणि मालमत्ता एकत्रित बिले दिली आहेत.

Web Title: seized property auction kishor raje nimbalkar