Sakal Exclusive : पीएमश्री योजनेतंर्गत धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील 15 शाळांची निवड

PM Shri scheme
PM Shri schemeesakal

Nandurbar News : पीएमश्री योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील आठ शाळांची तर धुळे जिल्ह्यातील सात शाळांची निवड करण्यात आली आहे.

त्यात अक्राणी, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील प्रत्येकी एक शाळेचा तर शहादा व तळोदा तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. (Selection of 15 schools in Dhule Nandurbar district under PM Shri scheme nandurbar news)

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून या शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात निवड येणार आहे.

या योजनेतील करारानुसार निवड झालेल्या शाळांसाठी ६० टक्के निधी केंद्र शासनाकडून तर ४० टक्के निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे. दरम्यान शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून, विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PM Shri scheme
Nashik News : पक्ष्यांची भूक भागविण्यासाठी ‘त्यांचा’ 4 वर्षापासून नित्यक्रम

त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज केले. तज्ज्ञांच्या नियुक्त केलेल्या समितीने या टप्प्यांमध्ये आवश्यक ती कामगिरी करणाऱ्या शाळांची निवड केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आठ शाळांचा समावेश

पीएमश्री योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील आठ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात अक्राणी तालुक्यातील काकर्दा येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा, अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेची उर्दू शाळा नंबर २, नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील जिल्हा परिषदेची शाळा,

नवापूर तालुक्यातील भादवड येथील जिल्हा परिषदेची शाळा तसेच शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा व शहाद्यातील म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल आणि तळोदा तालुक्यातील पुनर्वसन नंबर ३ येथील जिल्हा परिषदेची अप्पर प्रायमरी स्कूल व तळोद्यातील जिल्हा परिषदेची शाळा नंबर ६ आदी शाळांचा समावेश या योजनेतंर्गत करण्यात आला आहे.

PM Shri scheme
Nandurbar News : 2 लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकरी : डॉ. विजयकुमार गावित

धुळे जिल्ह्यातील सात शाळांचा समावेश

पीएमश्री योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यातील ७ शाळांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात धुळ्यातील जिल्हा परिषदेची शाळा व महानगरपालिकेची शाळा नंबर २५, साक्री तालुक्यातील धामणार येथील जिल्हा परिषदेची शाळा,

शिंदखेडा तालुक्यातील मंडल येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, दोंडाईचा येथील नॅशनल प्राथमिक शाळा नंबर २ तसेच, शिरपूर तालुक्यातील सुळे येथील जिल्हा परिषदेची शाळा व शिरपूर येथील पी. बी. माळी म्युनिसिपल हायस्कूलचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या ज्ञान, विचारांची सांगड

पीएमश्री शाळांमधून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक व आनंददायी शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वैचारिक समज व वास्तविक जीवनातील ज्ञानाचा वापर याची सांगड घालून त्यांना शिकविण्यात येणार आहे.

PM Shri scheme
Nandurbar News : सौर ऊर्जेच्या साथीने फुलली शेती; अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

या शाळांचा विकास प्रामुख्याने अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन, प्रवेश व पायाभूत सुविधा, मानव संसाधन व शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती व समाधान, व्यवस्थापन, देखरेख व प्रशासन आणि लाभार्थी समाधान या सहा स्तंभावर करण्यात येणार आहे.

पीएमश्री शाळेची वैशिष्ट्ये

● या शाळा पूर्णपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत

● शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

● स्मार्ट क्लासरूम सोबतच आधुनिक संगणक लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय

● स्टेम लॅब, टिकरिंग लॅब तयार करण्यात येणार असून शिक्षकांना टॅबले

PM Shri scheme
सह्याद्रीचा माथा : उन्हाळा खडतर आहे, प्रत्येकाने जिवाला जपा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com