सेल्फीची मोह असणा-यांनो एकदा वाचाच....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक :  केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण..अशीच एक घटना घडली. सापुतारा येथे आपल्या कुटूंबा समवेत सहली निमित्ताने फिरण्यास आलेली महिलेने राईस पांईटवर लाॅरी मल्ला चालवत नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीने आपल्या मोबाईलमध्ये टिपत असताना अचानक लक्ष विचलित झाल्याने पाय घसरून खोल खिंडीत पडली.

नाशिक : बोरगाव जवळील सापुतारा येथे आपल्या कुटूंबा समवेत सहली निमित्ताने फिरण्यास आलेली महिला सुषमा मिलिंद पगारे (वय 48 ) रा. नाशिक ही महिला सन राईस पांईटवर नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीने आपल्या मोबाईलमध्ये टिपत असतांना अचानक लक्ष विचलित झाल्याने पाय घसरून खोल खिंडीत पडली. मात्र  दैव बल्लवतर म्हणून वाचली असून तिच्या कमरेला व चेह-याला गंभीर दुखापत झाली आहे.

तिला नवागाव येथील तरुणांनी खोल दरीतून बाहेर काढत सापुतारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस दिपक गावित व नातेवाईक महिंद्रा देशपांडे यांनी  सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: selfie slammed feet slid into a deep hole saputara