#Motivational : ज्येष्ठ व्यक्तीस एटीएममध्ये आढळले दहा हजार रुपये.. त्यानंतर त्यांनी... 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

गोविंदनगर येथील महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याने स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये सापडलेले दहा हजार रुपये बॅंकेकडे पुन्हा जमा करत समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे निवृत्त अधीक्षक मधुकर मेतकर गोविंदनगर भागात वास्तव्यास आहेत. मध्यंतरी ते परिसरातील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी पाचशे रुपयांच्या 20 नोटा म्हणजे दहा हजार रुपये आढळले. या वेळी त्या ठिकाणी अन्य कोणीही नव्हते.

नाशिक : फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरून एकीकडे अनेकांची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी (ता. 10) एटीएममध्ये सापडलेले दहा हजार रुपये संबंधित बॅंकेला परत करण्याचा प्रामाणिकपणाही दिसून आला. त्यामुळे समाजात अद्यापही चांगुलपणा, प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सकारात्मक चित्रही दिसून येते. 

Image may contain: 1 person, closeup

मधुकर मेतकर

दहा हजार रुपये ज्येष्ठाकडून परत 

गोविंदनगर येथील महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याने स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये सापडलेले दहा हजार रुपये बॅंकेकडे पुन्हा जमा करत समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे निवृत्त अधीक्षक मधुकर मेतकर गोविंदनगर भागात वास्तव्यास आहेत. मध्यंतरी ते परिसरातील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी पाचशे रुपयांच्या 20 नोटा म्हणजे दहा हजार रुपये आढळले. या वेळी त्या ठिकाणी अन्य कोणीही नव्हते. मेतकर यांनी हे पैसे ताब्यात घेऊन जवळील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कार्यालय गाठून शाखाधिकाऱ्यांकडे परत केले. एकीकडे सर्वत्र अप्रामाणिकपणा वाढलेला असतानाच्या पार्श्‍वभूमीवर मेतकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक बॅंक अधिकाऱ्यांसह इतरांनी केले आहे. 

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizen returns money showed their honesty at Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: