PHOTOS : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना पकडले...'या' पोलीस ठाण्याची चौथी घटना..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव हे ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीच जाळ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सातपूर पोलिस ठाण्याची ही चौथी घटना असून नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न उपस्थित होतोय.

नाशिक : सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव हे ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीच जाळ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सातपूर पोलिस ठाण्याची ही चौथी घटना असून नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न उपस्थित होतोय. 5 डिसेंबरला दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जाधव यास ताब्यात घेतले.

Image may contain: plant and outdoor

या प्रकरणाची अधिक माहिती अशी...

एका  गुन्हातील तक्रारदाचे पकडलेले स्कॉर्पिओ वाहन सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे जाधव यांनी पोलीस चौकीचे बांधकाम करण्यासाठी २ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १ लाख २० हजार रुपये त्यांनी घेतले होते. त्यानंतर आज (ता.६) यातील उररीत रक्कम ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

Image may contain: one or more people, people sitting and people standing

पोलिस ठाण्यात एकच खळबळ 

घटना समजताच पोलिस उपआयुक्त विजय खरात व सहाय्यक पोलिसआयुक्त अशोक नखाते यांनी सातपूर पोलिस ठाण्यात घाव घेतली. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच जाधव यांना एन्टी करप्शनच्या कार्यालयात पुढील कारवाईसाठी हलवले. याबाबत उपआयुक विजय खरात यांनी लगेचच सातपूरचे अधिकारी कर्मचारीची बैठक घेवून झालेल्या घटनांबाबत माहिती घेतली व तसे वरिष्ठांना कळवले. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून नेहमीच विविध कारणानी गजबजत असलेल्या सातपूर पोलिस ठाण्यात मात्र यानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला.

Image may contain: car, tree, sky, outdoor and nature

जाधव गेले काही महिने पोलीस चौक्या उभारण्यासाठी प्रयत्न करत होते

पी.आय.जाधव हे गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस चौक्या उभारण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांनी सातपूर मधील कंपन्या व इतर दानशुर लोकांकडून मदत देण्याचे आव्हानही करत होते. पण याच दरम्यान त्यांच्या वागण्याबाबतही काही कर्मचारी उलटसुलट चर्चा करताना दिसत होते. आज नेमके जाधव हे एन्टी-करप्शनच्या जाळ्यात अडकल्याने घात आपल्याच खात्याच्या कर्मचारीनी केला काय अशीही चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळते.

एकूण चार जण या कारवाईचे बळी

सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारीवर एन्टी-करप्शनच्या कारवाईत अडकल्याची ही पहिलीच वेळ असली तरी या अगोदर एक एपीआय रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी हजार रूपयाची लाच घेतांना, तर वेगवेगळ्या घटनेत दोन काॅन्टेबल असे एकूण चार जण या कारवाईचे बळी पडल्याची नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior police inspector arrested for taking bribe by Anti-Corruption Nashik Crime Marathi News