जेष्ठ राजकीय नेते कारभारी भिलोरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय नेते कारभारी द्वारकू भिलोरे पाटील यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

नांदगाव (नाशिक) - जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय नेते कारभारी द्वारकू भिलोरे पाटील यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. अनेक दिवसापासून प्रकृती खालावल्याने ते उपचार घेत होते. आज मध्यरात्री नांदगाव येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भौरी येथे धाव घेतली.

सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कर करण्यात आले. तालुक्याचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे साहेबराव पाटील, माजी आमदार ऍड. अनिल आहेर, माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, सजनतात्या कवडे आदींसह विविध राजकीय पक्ष सामाजिक शैक्षणिक संघटना व क्षेत्रातील लोकांनी दिवंगत कारभारी भिलोरेंना श्रद्धाजंली अर्पण केली.

तालुक्यातील राजकीय वर्तुळातील मुत्सद्दी मार्गदर्शक व जुन्या नव्या पिढीचा समन्वयक म्हणून समजल्या जाणाऱ्या कारभारी पाटीलांनी आमदारकी वगळता सत्तेतील सर्व पदे भूषविली होती.

Web Title: Senior political leader Karbhari Bhilore passed away