मृत्यूंची मालिका  व फितूर साक्षीदार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद/जळगाव - नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळीराम शिंदे याचा मृत्यू व त्याच्यावरील उपचाराशी डॉ. सुदाम मुंडे याच्या संबंधाच्या संशयामुळे परळीच्या स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणातील मुंडेचे दोन सहआरोपी, पहिला त्याचा सख्खा मेहुणा डॉ. अंगद केंद्रे व दुसरा जळगावचा डॉ. राहुल कोल्हे याचा मृत्यूही चर्चेत आला आहे. डॉ. सरस्वती मुंडेचा भाऊ अंगद याने जुलै २०१२ मध्ये जामिनावर सुटल्याच्या दिवशी आत्महत्या केली, तर डॉ. राहुल कोल्हे याचा डिसेंबर २०१३ मध्ये अपघाती मृत्यू झाला. 

अंगद केंद्रे याची आत्महत्या हा या प्रकरणाशी संबंधित पहिला मृत्यू होता. तेव्हाही शंका उपस्थित झाली होती. तथापि, डॉ. कोल्हे याच्या मृत्यूनंतर तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना षडयंत्राचा संशय का आला नाही? स्त्रीभ्रूणहत्येसारख्या भयंकर सामाजिक अपराधाचा तपास करणारी पोलिस यंत्रणा झोपली होती का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या मृत्यूचा पुरेसा तपास झाला नाही. शिवाय मुंडेच्या यंत्रणेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या धमक्‍या मिळत असल्याने साक्षीदार फितूर होऊ लागले. अगदी मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातावेळी मरण पावलेल्या विजयमाला पटेकर हिचेही नातेवाईक फितूर झाले. परिणामी बीड, जळगाव आदी ठिकाणचे संबंधित न्यायालयीन खटले पांगळे बनल्याचे चित्र आहे. सहा वर्षे व्हायला आली, तरी देशभर गाजलेल्या मुंडे प्रकरणात अद्याप न्यायालयाचा निकाल आलेला नाही. 

राहुल कोल्हेच्या मृत्यूने खटला पांगळा
ता. ६ डिसेंबर २०१३ (शुक्रवार) ला राहुल कोल्हे तपासासाठी अंबाजोगाईला गेला होता. तेथून तो एकटाच स्वत:च्या स्विफ्ट कारने (एमएच १९- एपी १२५९) परत येत असताना औरंगाबाद- जळगाव रस्त्यावर सिल्लोडजवळ आळंद शिवारात कुवरखेडी फाट्यावर रात्री उशिरा त्याचा अपघात झाला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वडोदबाजार पोलिस ठाण्यात त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे. अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केल्याचे व त्यामुळेच त्याची गाडी झाडाला धडकल्याचे सांगितले गेले. परिणामी जळगावातील खटला पांगळा झाला.

Web Title: series of deaths and fateful witnesses