शहरी भागात सातबारा हद्दपार? सातबाराऐवजी काय..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आनंदवली गावासाठी 27 नोव्हेंबरला गंगापूर रोडवरील आनंदवली भागातील सावित्रीबाई फुले विद्यालयात गंगापूर गावासाठी 28 नोव्हेंबरला गंगापूरगावातील तलाठी कार्यालयात नागरिकांना सनद प्राप्त होईल. याशिवाय जुन्या सीबीएस भागातील तालुका पोलिस ठाण्याशेजारील नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 कार्यालयात सनदा वितरित करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील 13 गावठाणांत नगर भूमापन योजना लागू करण्यात आली आहे. या गावातील मिळकतींचे नगर भूमापन अभिलेखांचे 
परीक्षण नगर भूमापन अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्याअंतर्गत महापालिकेत समाविष्ट असलेल्या साधारण तेरा गावठाणात नागरिकांना सनद मिळणार आहे. 

नगर भूमापन मिळकतीच्या सनद वाटप मोहिमेस सुरवात 

आनंदवली गावासाठी 27 नोव्हेंबरला गंगापूर रोडवरील आनंदवली भागातील सावित्रीबाई फुले विद्यालयात गंगापूर गावासाठी 28 नोव्हेंबरला गंगापूरगावातील तलाठी कार्यालयात नागरिकांना सनद प्राप्त होईल. याशिवाय जुन्या सीबीएस भागातील तालुका पोलिस ठाण्याशेजारील नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 कार्यालयात सनदा वितरित करण्यात येणार आहे. महापालिकेत समावेश झालेल्या आनंदवली, गंगापूर, सातपूर, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला, पाथर्डी, दसक, पंचक, मानूर, नांदूर, आगरटाकळी, देवळाली या गावातील शिल्लक सनद प्राप्त करून घेण्याबाबत भूमिअभिलेख उपसंचालक कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

सातबाराऐवजी सनद 
नगर भूमापन विभागातर्फे शहरात समावेश झालेल्या साधारण 13 प्रमुख गावठाणांतील मिळकतीच्या सनदी तयार करण्यात येत आहेत. मिळकतधारकांना नगर भूमापन अधिकारी कार्यालयाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन, तसेच प्रत्येक गावात शिबिर घेऊन सनद वाटप होणार आहेत. बांधकाम परवानगीकरिता आणि मिळकतींचे विकसनाकरिता कर्ज उभारणीस सनद आवश्‍यक आहे. मिळकतींच्या हस्तांतरणाच्या नोंदी मिळकतपत्रिकेवर घेण्यात येत असल्याने नागरिकांनी सनद प्राप्त करून घेऊन अधिकार अभिलेख अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. सनद हा न्यायालयीन प्रकरणातही महत्त्वाचा पुरावा मानला जातो. 

काय आहे सनद? 
सनद ही राज्य शासन व मिळकतधारक यांच्याकडील महत्त्वाचा करार असून, मालकी हक्काचा पुरावा आहे. सनदमध्ये मिळकतधारकांचे नाव, क्षेत्र, नकाशा, 
चतुःसीमा आदी बाबी नमूद असून, सनद हा खरेदी-विक्रीच्या व्यवहारात महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. नगर भूमापन योजना लागू झालेल्या गावांना मिळकतपत्रिका व सनद हा मालकी हक्काचा पुरावा ग्राह्य धरला जातो. ज्या मिळकतींचे नगर भूमापन अभिलेख तयार करण्यात आलेले आहेत अशा मिळकतींचे सातबारा उतारे बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख पुणे यांच्याकडून 30 ऑगस्ट 2018 पासून ही कारवाई सुरू आहे. बिनशेती मिळकत असलेल्या धारकांनी त्यांच्या मिळकतीची सनद प्राप्त करून घेणे आवश्‍यक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven times deportation in urban areas soon