शहाद्याच्या मुख्याधिकाऱ्यांना लाचलुचपतकडून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

शहादा - जमीन "एनए' (अकृषक) करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या भूखंड विकसकाकडून दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपात येथील पालिका मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पथकाने मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापा टाकून झडती घेतली असता पाच तोळे सोन्याचे दागिने, साडेचार हजार रुपये रोख रक्कम आढळून आली.

पालिका हद्दीत असलेल्या कुकडेल शिवारातील सर्व्हे नंबर 96/3 अ क्षेत्र 31 आर ही जमीन अकृषिक करण्यासाठी तक्रारदाराने पालिकेत अर्ज दाखल केला होता. मुख्याधिकारी डॉ. गवळी यांनी गेल्या 18 सप्टेंबरला पंच साक्षीदारांसमक्ष तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती; मात्र तक्रारदार 20 व 26 सप्टेंबरला लाचेची दोन लाख रुपयांची रक्कम देण्यास गेले असता डॉ. गवळी यांनी ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती.

Web Title: shahada nashik news officer arrested in bribe case