शाहीर वाणींचा समाजोत्थान पुरस्काराने गौरव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

धुळे - येथील शाहीर श्रावण वाणी यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजोत्थान पुरस्काराने गौरविण्यात आले. 

धुळे - येथील शाहीर श्रावण वाणी यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजोत्थान पुरस्काराने गौरविण्यात आले. 

कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आज झालेल्या शाहू- फुले-आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडीक यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समाज उत्थानाकरिता झटणाऱ्या राज्यातील १२५ समाजसेवकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अप्पा खताळ, आमदार सतेज पाटील, दत्तात्रेय सावंत, हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shahir Shravan Vani