भुजबळांच्या जाहिरातीतून शरद पवारांचा फोटो झाला गायब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आज भुजबळ यांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या जिल्ह्यातील सर्व दैनिकांना मोठ्या मोठ्या जाहिराती भुजबळ यांनी दिल्या असून यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो नसल्याने या चर्चेला अधिकच पुष्टी मिळाली आहे.

येवला : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार याची चर्चा त्यांच्या होमपिचवरही जोरदारपणे सुरू आहेत. मात्र याच वेळी भुजबळ यांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. भुजबळ यांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन आज होणार आहे. या कार्यक्रमाच्या जिल्ह्यातील सर्व दैनिकांना मोठ्या मोठ्या जाहिराती भुजबळ यांनी दिल्या असून यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो नसल्याने चर्चेला अधिकच पुष्टी मिळाली आहे.

वास्तविक आतापर्यंत भुजबळ जेव्हा-जेव्हा जाहिराती देतात, होर्डिंग बनवतात त्यावेळी पक्षातील इतरांचा नाही पण, शरद पवारांचा फोटो मात्र आवर्जून दिसून येतो. 

प्रत्येक वेळी शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोन फोटो आवर्जून असतातच मात्र, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मांजरपाडा सारख्या भव्यदिव्य प्रकल्पाला सुमारे साडेसातशे कोटीचा निधी दिला त्या, सरकारमधील पक्षाच्या अध्यक्षाचा फोटो नसल्यामुळे मतदारसंघातही तर्क-वितर्क लावले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad Pawar photo disappears from Bhujbals advertisement