चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती ;  मेंढपाळ व्यवसाय अडचणीत 

रोशन भामरे  
रविवार, 20 मे 2018

खांद्यावर कावळा एका हातात काठी दुसऱ्या हातात पाण्याची बाटली, डोक्याला फेटा किंवा टोपी व अंगात सदरा धोतर असा साधा पेहराव मेंढपाचा असतो. कसमादे परिसरातील अनेक गावात मेंढपाळांचे वास्तव्य असून त्यांना चारा व पाण्याच्या शोधात ह्या गावाहून त्या गावात अशी भटकंती करावी लागते. काही गावातील धनगर बांधव मेंढ्याचा व्यवसाय करतात. वास्तविक शेकडो रिकाम्या हाताना उद्योग म्हणून चांगला रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या मेंढपाळ व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही खुली झालेली दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील व्यवसायिकांना करावा लागतो. 

तळवाडे दिगर(जि.नाशिक) : अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा तीव्र उन्हाळयामुळे अडचणीत संपला असून व्यवसायिकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. सामान्यतः भटक्या विमुक्त जातीत हा व्यवसाय वडिलोपार्जित व परंपरागत म्हणून केला जातो.  शासनाने या समाजासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. हा समाज राज्य घटनेनुसार एस.टी. मध्ये समाविष्ठ असून महाराष्ट्र शासनाने त्यांना एनटी 'क' चे गाजर दाखवुन या समाजावर अन्याय केला जातो. त्यामुळे हा समाज अद्यापही दारिद्र्यात खितपत पडलेला असून यात्रिक युगातही प्रगती पासून कोसो दूर आहे. 

खांद्यावर कावळा एका हातात काठी दुसऱ्या हातात पाण्याची बाटली, डोक्याला फेटा किंवा टोपी व अंगात सदरा धोतर असा साधा पेहराव मेंढपाचा असतो. कसमादे परिसरातील अनेक गावात मेंढपाळांचे वास्तव्य असून त्यांना चारा व पाण्याच्या शोधात ह्या गावाहून त्या गावात अशी भटकंती करावी लागते. काही गावातील धनगर बांधव मेंढ्याचा व्यवसाय करतात. वास्तविक शेकडो रिकाम्या हाताना उद्योग म्हणून चांगला रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या मेंढपाळ व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही खुली झालेली दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील व्यवसायिकांना करावा लागतो. 

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही हे व्यावसायिक आपल्याच दिनचर्येत खुश असतात. झुडपी वनकायद्यामुळे मेंढ्यांना जंगलात प्रवेश बंदी झाली आहे. तसेच इतरत्र चाऱ्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने व या वर्षाला कडक उनाच्या तीव्रतेने नद्या, नाले, तलाव आटले आहेत. चारा पाण्यासाठी हा मेंढपाळ गावोगावो भटकत असून चारा पाणी मिळेल तेथे आपला वाडा टाकत आहे. निरनिराळ्या जातीच्या वृक्षाचा पालापाचोळा खाणाऱ्या मेंढ्यांना अर्धपोटी राहव लागत असून त्यामुळे त्या अनेक रोगांना देखील बळी पडत आहेत.

Web Title: shepherds' wander in search of food; Shepherd Business in difficult condition