पोलिसाकडून बालिकेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शिरपूर - अल्पवयीन बालिकेचा पोलिसाने विनयभंग केल्याची घटना आज सकाळी थाळनेर (ता. शिरपूर) येथे घडली. यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. संशयित पोलिसाच्या दुचाकीची मोडतोड करून ती जाळण्यात आली.

शिरपूर - अल्पवयीन बालिकेचा पोलिसाने विनयभंग केल्याची घटना आज सकाळी थाळनेर (ता. शिरपूर) येथे घडली. यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. संशयित पोलिसाच्या दुचाकीची मोडतोड करून ती जाळण्यात आली.

पीडित बालिकेची आजी गावातील शाळेसमोर गोळ्या-बिस्किटे विकते. आज सकाळी नऊला थाळनेर पोलिस ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेला नासिर खान पठाण (वय 47) हा तिच्या दुकानावर गेला. पानमसाल्याची पुडी घेऊन त्याने दहावर्षीय बालिकेशी अश्‍लील वर्तन केले. हा प्रकार लक्षात येताच बालिकेच्या आजीने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांना पाहून पठाणने तेथून पळ काढला. त्याचा पाठलाग करत नागरिकांनी त्याला बसस्थानकात गाठले. तेथे त्याला पकडत चोप देण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी लावलेल्या पठाणच्या दुचाकीची मोडतोड करून काहींनी ती पेटवून दिली. या घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. पठाणची जमावाच्या तावडीतून सुटका करून त्याला पोलिस ठाण्यात नेले. नागरिकांनीही तिकडे धाव घेतली. पोलिस ठाण्याबाहेर एकत्र झालेल्या नागरिकांनी पठाणला ताब्यात देण्याची मागणी केली.

खिडकीच्या काचा फुटल्या
दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या खिडकीची तावदाने फुटली आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडित बालिकेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पोलिस कर्मचारी नासिर खान पठाण याच्याविरुद्ध विनयभंगासह "पॉस्को' कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: shirpue news jalgaon news