आरक्षण, कोपर्डीप्रश्‍नी तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

शिरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, कोपर्डी हत्याकांडातील संशयितांना शिक्षा होत नाही म्हणून निराश झालेल्या अमोल नारायण शिंदे (27, रा. हिसाळे, ता. शिरपूर) या युवकाने सोमवारी दुपारी तापी नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसे कारण त्याने दिले आहे. अमोल मूळचा धनूर (ता. धुळे) येथील आहे.

चोपडा (जि. जळगाव) येथील समाजकार्य महाविद्यालयात तो शिकत होता. आज सकाळी तो महाविद्यालयात अर्ज भरण्यासाठी गेला. त्यानंतर शिरपूरला सेतू केंद्रात तो कामानिमित्त गेला. तेव्हापासून त्याचा संपर्क तुटला होता. नातलग व मित्र त्याचा शोध घेत होते. दरम्यान सावळदे येथील पुलावर त्याची दुचाकी आढळली. तत्पूर्वी तेथे एकाला उडी घेताना काहींनी पाहिले होते. ही माहिती मिळताच त्याचे नातलग सावळद्याला पोचले. पुलाजवळ त्याची दुचाकी, मोबाईल, पाकीट व चिठ्ठी त्यांना आढळली. त्यावरून आत्महत्या करणारा युवक अमोल शिंदे असल्याची खात्री पटली. स्थानिक मच्छीमारांनी शोध घेतला असता सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.

Web Title: shirpur nashik news youth suicide by reservation & kopardi case