शिवछत्रपती पुरस्कारातून क्रीडा संघटकांना वगळले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

तळोदा: सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा कार्यकर्ते- संघटक व क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारांची नवी नियमावली २४ जानेवारीला जाहीर करण्यात आली असून, यातून क्रीडा चळवळ वाढीसाठी योगदान देणाऱ्या क्रीडा संघटकांना या पुरस्कारातून वगळण्यात आले आहे.

तळोदा: सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा कार्यकर्ते- संघटक व क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारांची नवी नियमावली २४ जानेवारीला जाहीर करण्यात आली असून, यातून क्रीडा चळवळ वाढीसाठी योगदान देणाऱ्या क्रीडा संघटकांना या पुरस्कारातून वगळण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभागातून क्रीडा विभाग वेगळा झाल्यानंतर १९६९-१९७० पासून सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना, १९८८-८९ पासून क्रीडा मार्गदर्शकांना, तर क्रीडा संघटक- कार्यकर्ते, क्रीडापटूंना २००२ पासून शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत होते. क्रीडा क्षेत्रातील हा शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असल्याने समाजात मानसन्मान तर वाढीस लागला. पण, क्रीडा चळवळ वाढीसही पुरस्काराच्या रूपाने बळ मिळाले. कुठल्याही संघटनांची अथवा अभ्यासगटाची रद्द करण्याबाबत मागणी अथवा वगळण्याबाबत शिफारस नसताना क्रीडा संघटक पुरस्कार रद्द करण्यात आल्याने अनेक कार्यकर्ते संघटकांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. हा पुरस्कार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केली आहे.

महागाईने रिक्षा व्यवसायापुढे संकटे

या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंद पवार, राजेंद्र पवार, खजिनदार घनश्याम सानप, राजेश जाधव, राजेंद्र कदम, लक्ष्मण बेल्लाळे, विलास घोगरे, प्रीतम टेकाडे, शंकर शहाणे, जयदीप सोनखासकर यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, क्रीडा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, उपाध्यक्ष शैलेश रघुवंशी, सचिव मीनल वळवी, पंकज पाठक, डॉ. मयूर ठाकरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

खेळांचा प्रचार अन् प्रसाराचे कार्य!
महाराष्ट्रात विविध खेळांचा प्रचार- प्रसार करण्याचे काम संघटक व कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्यात येते. विविध स्पर्धांसाठी शासनाकडे स्वतःचे तांत्रिक मनुष्यबळ नसून, संघटनेच्या तांत्रिक बळाअभावी क्रीडा विभाग पंगू आहे. शालेय स्पर्धा आयोजन नियोजनासाठी क्रीडा विभागांतर्गत क्रीडाधिकारी, मार्गदर्शकांची वाणवा असताना सर्व जबाबदारी क्रीडा संघटक, कार्यकर्ते म्हणून जबाबदारी शारीरिक शिक्षण शिक्षक पार पाडतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Chhatrapati award excludes sports organizers