अरबी समुद्रात शिवछत्रपती स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नाशिक - मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या स्मारकाचा भूमिपूजन आणि जलपूजनाचा सोहळा 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. त्यासाठी नाशिकमधून 25 हजार शिवप्रेमी मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली.

श्री. महाजन म्हणाले, की शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची सुरवातीला 192 मीटर होती. ती आता 215 मीटर करण्यात आली. जगातील सर्वांत उंच हा पुतळा असून, तीन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारकात हॅलिपॅड, सभागृह, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, अशी व्यवस्था असेल. स्मारकाचा निर्णय 2002 मध्ये झाला असला, तरीही त्यासाठीच्या मान्यतेच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकारच्या मान्यता मिळविल्या आहेत. शिवछत्रपती स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारी (ता. 22) नाशिकमधून फेरी काढण्यात येईल. याशिवाय 70 नद्यांचे पाणी आणि किल्ल्यांवरील माती आणली जाणार आहे. त्यात नाशिकमधील गोदावरीच्या तीर्थाचा समावेश असेल. 23 ला गेट वे ऑफ इंडियापुढे मुख्यमंत्री हे जलकलश स्वीकारतील, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

Web Title: Shiv Chhatrapati monuments ceremony on Saturday at the hands of the PM