Pandit Pradeep Mishra while presenting the story of Sri Shiva Mahapuran according to Here Medical. Crowd in front.
Pandit Pradeep Mishra while presenting the story of Sri Shiva Mahapuran according to Here Medical. Crowd in front.esakal

Shiv Mahapuran Katha : धुळ्यात श्री शिवमहापुराण कथास्थळी जनसागर उसळला : पंडित प्रदीप मिश्रा

Published on

Shiv Mahapuran Katha : सध्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये या राज्यातील प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रहिताच्या हेतूने मतदान केले पाहिजे. वस्त्रदान, अन्नदान आणि कन्यादान प्रमाणेच मतदानदेखील महत्त्वाचे आहे.

आपल्या मतदानाने राष्ट्र मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. आपले एक मत राष्ट्राला मजबूत करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.(shiv mahapuran was started in dhule from 15 november dhule news)

येथील सुरत बायपासलगत हिरे मेडिकलच्या परिसरात सरासरी ६० एकरात पंडित प्रदीप मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करीत आहेत. त्यास बुधवारी (ता. १५) प्रारंभ झाला. त्यांनी गुरूवारी दुसरे पुष्प गुंफताना सांगितले, की मुलगी ही दोन कुळांचा उद्धार करते.

माहेर आणि सासर या दोघांची कीर्ती वाढवते. मात्र, मुलींवर फार मोठी जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीने सनातन धर्मात प्रत्येकाचे कर्तव्य विशद केले आहे. त्यामुळे सनातन धर्मामध्येच मुलींनी विवाह केला पाहिजे. कोणत्याही दुसऱ्या धर्मात विवाह करून नये.

संस्कारशीलताच श्रीमंती

आपली पिढी ही संस्कारक्षम असली पाहिजे. मनुष्य पैसा आणि संपत्तीने श्रीमंत बनू शकतो. मात्र, संस्कारक्षम पिढी घडवणारा माणूस हा खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आपल्या मुलांना संस्कारीत करणे हे सर्वांत कठीण काम आहे. मुले आज्ञाधारी असतील, तर हीच खरी श्रीमंती आहे.

या देशाला तसेच सनातन धर्माला संस्कारीत मुलांच्या माध्यमातून मजबूत केले पाहिजे. परमात्म्याने मानवाला शरीर प्रदान केले ही साधारण बाब नाही. या जन्माचे सार्थक करण्यासाठी प्रत्येकाने जगणे आवश्यक आहे. मनुष्य प्रति दिवसाला २१६०० वेळेस श्वास घेतो. यातील काही श्वास परमेश्वराच्या नामस्मरणासाठी वापरला पाहिजे.

श्री शिवमहापुराण कथास्थळी मंडपाबाहेर झालेली भाविकांची गर्दी.
श्री शिवमहापुराण कथास्थळी मंडपाबाहेर झालेली भाविकांची गर्दी.esakal
Pandit Pradeep Mishra while presenting the story of Sri Shiva Mahapuran according to Here Medical. Crowd in front.
Shiv Sena: राऊत, विचारेंसह चार खासदारांवर शिवसेना करणार कायदेशीर कारवाई; नेमकं काय घडलंय?

दरवाजा खुला असावा

दिवाळी साजरी करत असताना बऱ्याच घरांमध्ये घर उघडे ठेवून दिवा लावला जातो. यासंदर्भात माहिती देताना पंडित मिश्राजी म्हणाले, की आपल्या घरात अतिथी येण्यासाठी तुमचा दरवाजा नेहमी खुला असला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञानदीपक असेल तर त्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल. श्री शिवमहापुराण कथेत शाप दिल्यानंतर लक्ष्मीमाता अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर आली आहे.

यानंतर एका गरीब वृद्ध महिलेच्या घरी लक्ष्मी गेली. या मातेला या महिलेने मध खाण्यासाठी दिले. यानंतर लक्ष्मी मातेने या वृद्ध आणि गरीब महिलेचा उद्धार केला. त्यामुळे आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपण तृप्त केले पाहिजे. हा संदेश दिवाळीच्या माध्यमातून असल्याचे त्यांनी सांगितले.

दर्शनाची अनेकांना संधी

शोभायात्रेत अविष्कार भुसे आणि अनुप अग्रवाल यांनी दर्शनासाठी अनेकांना संधी उपलब्ध करून दिली. दुसऱ्याला पुण्य मिळावे यासाठी झटणारे फार कमी असतात. त्यातच दोघांनी भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेली धडपड हे खऱ्या अर्थाने पुण्य कर्म असल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले.

दुसऱ्याच्या पुण्यासाठी धडपड करणाऱ्यांना परमेश्वर कधीही कमी पडू देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री शिवमहापुराण कथेत भाजपचे महामंत्री विजय चौधरी, मंत्री दादा भुसे यांच्यासह आयोजक आणि भाविकांनी महाआरती केली.

Pandit Pradeep Mishra while presenting the story of Sri Shiva Mahapuran according to Here Medical. Crowd in front.
Shiv Sena meeting : शिवसेनेची मुळे घट्ट - उद्धव ठाकरे

मंत्री भुसे, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, श्री. अग्रवाल, बाळासाहेब भदाणे, श्री. भुसे, श्री. मंडोरे यांनी कथेचे आयोजन केले आहे. कथेचा रविवारी (ता. १९) समारोप होईल.

माझे मन प्रफुल्लीत...

धुळे मुक्कामात उद्योजक चेतन मंडोरे यांच्या निवासस्थानी पहाटे साडेपाचला गोमातेला गरम पोळी खाऊ घातली जाते. ही बाब पहाटे मॉर्निंग वॉकवेळी माझ्या लक्षात आल्याने मंडोरे परिवाराच्या बाबतीत माझे मन प्रफुल्लित झाले. मंडोरे परिवारातील माता वालिबेन मंडोरे यांनी गोमातेसाठी केलेली सेवा हे देखील पुण्य कर्म असल्याचे पंडीत मिश्रा यांनी स्पष्ट केले.

श्री शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेल्या धार्मिक उपायांच्या माध्यमातून फायदा झालेल्या दोन बालकांना मंचावर पंडित मिश्रा यांनी बोलवले. यानंतर या बालकांना आशीर्वाद दिला. कथास्थळी गुरुवारी सरासरी तीन ते चार लाखांवर भाविक सहभागी झाले. लोटलेला भाविकांचा जनसागर पाहून पंडित मिश्रा भारावले.

Pandit Pradeep Mishra while presenting the story of Sri Shiva Mahapuran according to Here Medical. Crowd in front.
Shiva Mahapuran Katha: शिवमहापुराण कथेसाठी हजारो भाविक जाणार; रिक्षांसह वाहनांचे वैयक्तिकरित्या आरक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com