शिवसैनिक नाशिकच्या "या" बाळासाहेबांच्या प्रेमात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

अंबड - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याची असतात  'सात' मिळते जुळते चेहरे परंतू त्यापैकी एखादीच चेहरा आपल्याला कधी तरी बघायला मिळतो. असेच एक सेलिब्रेटी आहे ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाच्या जोरावर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, भारत व भारताबाहेरील लोकांच्या (चाहत्यांच्या )मनावर अधिराज्य गाजविले आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हिंदुर्हदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होय. त्यांचा 23 जानेवारी हा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट "ठाकरे" येत आहे.

अंबड - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याची असतात  'सात' मिळते जुळते चेहरे परंतू त्यापैकी एखादीच चेहरा आपल्याला कधी तरी बघायला मिळतो. असेच एक सेलिब्रेटी आहे ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाच्या जोरावर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, भारत व भारताबाहेरील लोकांच्या (चाहत्यांच्या )मनावर अधिराज्य गाजविले आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हिंदुर्हदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होय. त्यांचा 23 जानेवारी हा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट "ठाकरे" येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या चेहऱ्याचा वारसा चालविणाऱ्या नाशिकस्थित श्री विवेक देवरे यांच्या बद्दलची कुतूहलता निर्माण करणारी बाब याज यानिमित्ताने आपणासमोर मांडण्याचा योगायोग...

श्री. विवेक महादेव देवरे वय 41 हे मुळचे मालेगांव तालुक्यातील रावळगांव येथील. गेल्या काही वर्षापासून ते आपल्या परिवारासह नाशिक येथील सिडको परिसरात स्थित झालेले आहेत. आई वडील दोन भाऊ, पत्नी व दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. सध्या ते खासगी नोकरी करतात. हे करत असतांना त्यांना एका व्यक्तिमत्वाने झपाटले आहे. ते म्हणजे दस्तरखुद्द दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे होय. याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे त्यांचा दिसणारा बाळासाहेबां सारखा चेहरा व देहबोली.

त्यांच्या या बाळासाहेबरुपी चेहऱ्यावर सध्या हाजारो शिवसैनिक व बाळासाहेब प्रेमी त्यांना भेटण्यासाठी, फोटो व सेल्फी काढण्यासाठी आतूर होत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सिडकोतच नव्हे तर ते जेथे जातील तेथे त्यांच्याशी बोलण्याकरिता तसेच त्यांच्या स्वतःबद्दल व त्यांचा बाळासाहेबां सारखा दिसणाऱ्या साधर्म्याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसतात हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की देवाने माझा चेहरा बाळासाहेबांसारखा दिला. ज्यांनीं मराठी माणसांसाठी अख्खे आयुष्य घातले. ज्यांच्या आवाजावर हजारो शिवसैनिक काहीही करण्यास तयार होते. अशा व्यक्तिमत्वाचा चेहरा मिळाला मी स्वतःला धन्य समजतो. संधी मिळाल्यास शिवसैनिकांसाठी काहीही करण्यास माझी तयारी आहे.
 - विवेक देवरे, सिडको.

विवेक देवरे यांचे बाळासाहेबांबद्दल भावपूर्ण मनोगत,
नुकतेच शालेय शिक्षा पूर्ण झाले होते. युती सत्ता येण्याअगोदरची गोष्ट मी पूर्वी त्रिमूर्ती चौकात राहात असे, दिवसभर प्रत्येक माणसात एकच चर्चा ऐकायला येत होती. की परवा बाळासाहेब ठाकरेंची सभा आहे. गोल्फ क्लब मैदानावर, दोन दिवस चौकात राहून तेच ऐकत होतो. मग मनात सारखे विचार की कोण आहेत. बाळासाहेब ठाकरे हे कुतूहल होते मनात होते. तो दिवस आला, संध्याकाळची सभा होती कसे जायचे सभेला बसेस हौस फुल होत्या. सर्व सभेला चालले होते. त्या गर्दीत मला जाणे शक्य नव्हते. बसचे भाडे द्यायला सुद्धा खिशात पैसे नव्हते. मग पायी एकटा गेलो. सभा चालू व्हायची होती. गोल्फ क्लब मैदान तुडुंब भरलेले होते. इतक्या लांबून दिसणे शक्य नव्हते. तशी माझी शरीरीयष्टी बारीक असल्याने मी गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचलो..बऱ्याच वेळाने मग बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण चालू होणार अशी घोषणा झाली. जशी बाळासाहेबांची भाषणाला सुरुवात होणार त्याआधी जवळपास १० ते १५ मिनिटे जय भवानी जय शिवाजी. हिंदुहृदयसम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अशा गर्जनांनी ते मैदान गजबजून गेले आणि मनात एक वेगळाच संचारले...तेव्हा पासून साहेब मला आवडायला लागले...तेव्हापासून पासून माझ्या अंगात काही तरी संचारले आणि यानंतर मी बाळासाहेबवेडा झालो ....यापुढे मी कार्यक्रमानिमित्त पांढरा कुर्ता आणि पायजमा घालायला सुरुवात केली..त्याच दिवशी माझ्या पत्नीने मला सांगितले आज तुम्ही अगदी बाळासाहेबांसारखे दिसतात. पण मी ते फारसे मनावर घेतले नाही...मग माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा माझे मित्रपरिवार मला बोलले अरे तू बाळासाहेबांसाखा दिसतोस तेव्हापासून मला वाटायला लगले की आपण सहेबासरखे दिसतो...आज असा पोशाख करून जेव्हा मी नाशिक ते कोल्हापूर प्रवास करातो  तेव्हा सर्वच जाती धर्मातील लोकांकडून मला प्रेम मिळत आहे....ते आजही टिकून आहे. सर्वात पहिला अनुभव मला नासिक पुणे महामार्गावर एका हॉटेलमध्ये  आला. हॉटेलच्या बाजूला एक दुकान आहे तेथे मुलांसाठी काहीतरी घ्यायला गेलो. शॉपचा मालक माझ्याकडे बघतच राहिला. अचानक काही सेकंद झाले त्यांच्या डोळ्यात मी पाणी येतांना पहिले..मग मी त्यांना विचारले काय झाले ? ते बोलले शब्द नाहीत माझ्या कडे सांगायला, तुम्हाला बघून आज बाळासाहेबांची आठवण झाली. मी सुद्धा भारावून गेलो. असे बरेच अनुभव मला आलेत.

एक तर असा अनुभव होता की त्यावेळेस दुसऱ्यांदा  माझ्या डोळ्यात पाणी आले..नाशिकमधील एका मॉलच्या सिग्नलला उभा होतो. माझ्या पुढे एक शाळेची व्हॅन होती त्यात ५ ते सहा वर्ष वयाच्या मुली होत्या. मी अगदीच बाजूला उभा होतो. मग त्या व्हॅन मधील एक गोंडस मुलीने हसत मला प्रश्न विचारला काका तुम्ही बाळासाहेब ठाकरे आहेत ना. तुमचा फोटो आहे आमच्या घरात.  ते ऐकून मी निशब्द झालो... त्या चीमुकलीला मी त्यावेळेस काहीच़ उत्तर देऊ शकलो नाही...आणि माझ्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या. असे बरेच... अनुभव आहेत त्यातील माझ्या कायम लक्षात राहतील असे हे अनुभव...पण बाळासाहेब असण्याच्या आनंदापेक्षा ...बाळासाहेब नसण्याचे दुखः मला नेहमी सतावते हीच एक खंत नेहमी सतावते अशा वेळी डोळ्यातील आसवं आकाशाकडे बघून बाळासाहेब कोठे दिसतात का असा विचार मनात आणून ती आसवं डोळ्यातच जिरवाण्याचा प्रयत्न करत असतो.....आणि म्हणतो बाळासाहेब तुम्हीं पुन्हां जन्माला या नां !

Web Title: Shiv Sainik are in In Love Nasik's Balasaheb