शिवसेनेच्या आशा कोल्हे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

महापालिका प्रभाग २४ ‘अ’मधून भाजपसह अपक्षाची माघार

जळगाव - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ ‘अ’च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तथा माजी महापौर आशा कोल्हे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी भाजपसह अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. ‘मनसे’च्या नगरसेविका अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. महापालिकेत आता शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या दोन झाली आहे.

पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून आशा दिलीप कोल्हे, भाजपकडून अनिता शंकर चौधरी, अश्‍विनी चेतन चौधरी, अपक्ष मनीषा शैलेद्र ठाकूर, सरला चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत भाजपच्या अश्‍विनी चेतन चौधरी व मनीषा शैलेंद्र ठाकूर यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात तीन उमेदवार होते. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. 

पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या आशा कोल्हे बिनविरोध
भाजपच्या उमेदवार अनिता चौधरी आणि अपक्ष उमेदवार सरला चौधरी यांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात केवळ शिवसेनेच्या आशा कोल्हे यांचा अर्ज असल्याने, त्यांची निवड बिनविरोध जाहीर झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा आहेत.

बिनविरोध विजयी झालेल्या आशा कोल्हे पहिल्या महापौर आहेत. त्यावेळी त्या अपक्ष निवडून आल्या होत्या. खानदेश विकास आघाडीतर्फे त्यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यांच्या विजयामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या अधिकृत नगरसेवकांची संख्या आता दोन झाली आहे. यापूर्वी लता चंद्रकांत सोनवणे यादेखील शिवसेनेतर्फे पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून आतषबाजी
श्रीमती कोल्हे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच महापालिकेसमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी श्रीमती कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समितीच्या सभापती डॉ. वर्षा खडके यांच्यासह खानदेश विकास आघाडी, शिवसेना व ‘मनसे’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  श्रीमती कोल्हे यांचा सत्कार केला.

Web Title: Shiv Sena may Kolhe unopposed