
तुकाराम भिका पाटील (रा.कारली) असं या शिवसैनिकाचं नाव आहे. तसेच 2003 ते 2013 पर्यंत त्यांनी कार्ली शिवसेनेचे शाखा प्रमुखपद भूषविले आहे.
नंदुरबार : सध्या राज्यात सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या नाट्याला कंटाळून राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन करावे, या मागणीसाठी कारली (ता. नंदुरबार) येथील शिवसैनिकाने मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
तुकाराम भिका पाटील (रा.कारली) असं या शिवसैनिकाचं नाव आहे. तसेच 2003 ते 2013 पर्यंत त्यांनी कार्ली शिवसेनेचे शाखा प्रमुखपद भूषविले आहे.
- शरद पवारांना ऱोखण्यासाठीच राष्ट्रपती राजवटीची घाईगडबड?
''महाराष्ट्राने युतीला भरभरून प्रेम दिले. त्याला लाथाडणे हा जनादेशाचा अपमान आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-सेना या दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक घेऊन महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावेत. जनतेची निराशा करू नये. हे सांगण्यासाठीच आणि माझ्या मागण्या महायुतीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी टॉवरवर चढलो होतो,'' असे मत तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले.
- असं काय झालं ? उद्धव ठाकरे का रागावलेत संजय राऊत यांच्यावर...
त्यानंतर स्थानिक पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून पाटील टॉवरवरून खाली उतरले.