चांगले काम करून घराघरांत शिवसेना पोचवा : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सुरगाणा : जल, जंगल, जमीन तसेच  झाडांपानावर पिढयान पिढ्या आदिवासींचाच अधिकार आहे.येथील जमीन आदिवासींच्या नावावर झाली  पाहिजे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी आदिवासी विकास प्रकल्प  कळवण व घागबारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आयोजित  आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्या प्रसंगी केले. 

सुरगाणा : जल, जंगल, जमीन तसेच  झाडांपानावर पिढयान पिढ्या आदिवासींचाच अधिकार आहे.येथील जमीन आदिवासींच्या नावावर झाली  पाहिजे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी आदिवासी विकास प्रकल्प  कळवण व घागबारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आयोजित  आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्या प्रसंगी केले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संजय राऊत, प्रमुख पाहुणे ग्रामविकास  मंत्री दादा भुसे, आमदार जे. पी. गावित, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, भाऊसाहेब चौधरी, नाशिक जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, केशरनाथ पाटील, रंजनाताई नेवाळकर, स्नेहल  मांडे, सोनाली राजे भोसले, धनराज महाले, भास्कर गावित आदी उपस्थित होते. 

सोहळ्यातील वधू वरांना उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन मी आलो आहे. नव दाम्पत्यांचा संसार सुखाचा व भरभराटीचा जावो. आदिवासी भागात शिवसैनिकांना सामाजिक  कार्य करण्यास अनेक संधी उपलब्ध आहेत. सामाजिक काम उभे करून शिवसेना घरघरात पोहचवावी. सामाजिक कामात पक्षभेद  विसरून सर्वांनी मिळून  एकत्र काम केले पाहिजे. आदिवासी बांधवांच्या विकासाकरीता राजकीय  पक्षातील मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतक-यांच्या मागण्या  करीता मुंबईच्या मोर्चाला शिवसेनेने जाहीर  पाठिंबा दिला होता. दादा भुसे यांनीही शुभेच्छा दिल्या.

या विवाह सोहळ्यात चौसष्ट जोडप्यांचा समावेश होता. विवाह सोहळ्याकरीता परिसरातील चार हजारापेक्षा  जास्त नागरिकांची  उपस्थिती होती. विवाह  सोहळा यशस्वीते करीता शिवसेना तालुका प्रमुख  मोहन गांगुर्डे, उप तालुका  प्रमुख कृष्णा चौधरी, शहर प्रमुख भरत वाघमारे, उपजिल्हा प्रमुख योगेश वार्डे, हरिभाऊ  भोये, सुरगाणा उपनगराध्याक्ष सचिन आहेर,  नगरसेवक सुरेश गवळी,पुष्पा  वाघमारे,शेवंता वळवी, तृप्ती  चव्हाण,रामजी गवळी, सुशीला चौधरी,राजू माळी, गणेश चाफळकर शिवसेनेचे  गण, गट प्रमुख  कार्यकर्ते  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena should reach out to each house says Sanjay Raut