शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

धुळे : शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात पांझरा नदीकाठी रस्ते विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणाचे प्रकरण हरित लवादापुढे सुनावणीस आहे. यामध्ये जुनेधुळे भागात वादग्रस्त स्मशानभूमी आणि मंदिर हे आज पोलिस, महसूल, पीडब्लूडी, सिंचन विभागाच्या अधिका-यांच्या बंदोबस्तात पाडण्यास सुरवात झाली आहे. प्रा. पाटील, माळी घटनास्थळी गेले असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आठवड्यापूर्वी याच स्वरूपाच्या वादग्रस्त कारवाईवरून, माळी कुटुंबाविरूध्द आमदारांनी खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी भाजप आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेत टोकाचा वाद सुरू आहे. आमदार गोटेंच्या निषेधार्थ शिवसेनेने नुकताच मूक महामोर्चा काढला होता. यानंतर पांझरा नदीकाठी पुन्हा कारवाई सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title: Shiv Sena's former MLA, District President in police custody