शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

shivaji chumbhle.jpg
shivaji chumbhle.jpg

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कामगारास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांनी चांगलीच भोवली असून , जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभापती पदही गेले आहे. 

सहकारी खात्याच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. गेल्या महिन्यात बाजार समितीच्या कंत्राटी कामगारास कायम करण्यासाठी तीन लाख रुपयाची लाच घेतना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी चुंभळे यांच्या बाजार समितीचे सभापती असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा तसेच बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने लाचलुचपत विभागाने जिल्हा उपनिबंघकांना पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार गौतम बलसाने यांनी बाजार समितीला पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक कामकाजात सहभागी होऊ न देण्याच्या सुचना बाजार समितीकडून आल्या होत्या. मात्र जिल्हा उपनिबंघकाच्या या पत्राला चुंभळे यांनी आव्हान देऊन बाजार समितीच्या कामकाजात सहभागी झाले होते.

या संदर्भात उपनिबंधकाकडे अपिलावर सुनावणी घेण्यात आली. त्यात चुंभळे यांच्या वतीने युक्तिवाद करून ते लोकसेवक व्याख्येत बसत नसल्याने नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी या संदर्भातील सुनावणी होऊन उपनिबंधकानी निर्णय राखून ठेवला होता. त्याचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आला. त्यात बाजार समितीच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com