'सुडाचे राजकारण हाच सत्ताधाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम'

भगवान जगदाळे
रविवार, 30 डिसेंबर 2018

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह प्रतिमापूजन व फीत कापून योजनेचे उदघाटन झाले. जैताणेतील संजयनगरसह जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळांना ग्रामपंचायतीतर्फे साऊंड सिस्टीमही भेट देण्यात आल्या. निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही ग्रामपंचायतींतर्फे शिवाजी दहिते यांचा सत्कार करण्यात आला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दशरथ पाटील, गटनेते तथा माजी सरपंच संजय खैरनार, विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह प्रतिमापूजन व फीत कापून योजनेचे उदघाटन झाले. जैताणेतील संजयनगरसह जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळांना ग्रामपंचायतीतर्फे साऊंड सिस्टीमही भेट देण्यात आल्या. निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही ग्रामपंचायतींतर्फे शिवाजी दहिते यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी दहिते यांच्यासह पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, माजी सरपंच संजय खैरनार, सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार आदींनी मनोगते व्यक्त केली. मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या विशेष योजनेंतर्गत ग्रामस्थांना एटीएमद्वारा पाच रुपयांत वीस लिटर शुध्द पिण्याचे पाणी दिले जाणार आहे.

यावेळी बोलताना शिवाजी दहिते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आहे. सद्या जातीयवादी शक्ती समाजात फूट पाडून जाती-धर्मात तेढ निर्माण करून गटातटाचे, जातीपातीचे, सुडाचे संकुचित राजकारण करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेने या मनुवादी सरकारला येत्या काळात धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी जैताणे ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी पाच लाख रुपये निधीही देण्याचे जाहीर केले. प्रा.भगवान जगदाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपसरपंच नवल खैरनार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनेते संजय खैरनार, सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे, आबा भलकारे, शानाभाऊ बच्छाव, गणेश देवरे, दादा भिल, रेवाबाई न्याहळदे, सुरेखाबाई बोरसे, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, प्रमिलाबाई जाधव, आशाबाई सोनवणे, मनीषा बागुल, छाया कोठावदे, सुरेखा भिल, लिपिक योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागुल, कपिल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: shivaji dahite criticize political leaders