शिवाजी उद्यानाच्या "गंजोटली गॅंग'चा उपद्रव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

जळगाव - मुलाची लग्नपत्रिका वाटप करून परतणाऱ्या सेवानिवृत्त हेड मेकॅनिकला शिवाजी उद्यानात रस्ता भटकल्यावर तलावाच्या बांधावर नेवून बेदम मारहाण करून त्याच्याजवळील 50 हजार रुपये लुटल्याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामागे मेहरुण तलावालगतच्या शिवाजी उद्यानातील "गंजोटली गॅंग' असून, तिनेच हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहा जणांना एमआयडीसी ठाण्यातील पोलिसांनी आज अटक केली. संशयितांची ओळखपरेड घेण्यासाठी त्यांना न्यायालयाने कारागृहात रवाना केले आहे. 

जळगाव - मुलाची लग्नपत्रिका वाटप करून परतणाऱ्या सेवानिवृत्त हेड मेकॅनिकला शिवाजी उद्यानात रस्ता भटकल्यावर तलावाच्या बांधावर नेवून बेदम मारहाण करून त्याच्याजवळील 50 हजार रुपये लुटल्याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामागे मेहरुण तलावालगतच्या शिवाजी उद्यानातील "गंजोटली गॅंग' असून, तिनेच हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहा जणांना एमआयडीसी ठाण्यातील पोलिसांनी आज अटक केली. संशयितांची ओळखपरेड घेण्यासाठी त्यांना न्यायालयाने कारागृहात रवाना केले आहे. 

शहरातील रामानंदनगरातील रहिवासी तथा परिवहन विभागाचे सेवानिवृत्त हेड मेकॅनिक अरुण काशिनाथ सोनार (वय 60) यांच्या मुलाचे 20 जानेवारीला लग्न आहे. अवघ्या काही दिवसांवर लग्नसोहळा आल्याने नातेवाईक व मित्रपरिवारास पत्रिका देणे सुरू आहे. अरुण सोनार रविवारी (15 जानेवारी) सायंकाळी मेहरुणमधील रामेश्‍वर कॉलनीतील नातेवाइकांना पत्रिका देऊन दुचाकीवरून घराकडे परतत असताना शिवाजी उद्यानाजवळ एका तरुणाने "इकडून जाऊ नका, रस्ता खणला असल्याने बंद आहे', असे म्हणत अंधारात जे. के. पार्ककडील रस्त्यावर पाठविले. सोनार दुचाकीवरून तेथे पोहोचल्यावर तलावाच्या बांधावर गाडी चढवून देतो, असे म्हणत रिक्षातून आलेल्या पाच-सहा संशयितांनी गाडी वर चढविण्याचे नाटक केले. मोबदला म्हणून सोनार यांनी शंभर रुपये खुशाली दिली. मात्र, गांजाच्या नशेत तर्रर्र असलेल्या एकामागून एक सर्व संशयितांनी सोनार यांचे खिसे तपासून पाहत त्यांना मारहाण करत 48 हजार 800 रुपये रोख व हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण पन्नास हजारांचा ऐवज लुटून नेला होता. 

सर्व संशयित अटकेत 
सोनार यांनी पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे घटना कथन केल्यानंतर कुऱ्हाडे यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, गुन्हे पथकाचे शरद भालेराव, विजय नेरकर, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, अशरफ शेख, अशोक सनकत यांचे पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना केले. यानंतर दिवसभर शोधमोहीम राबविल्यानंतर पथकाने शेख इरफान ऊर्फ मोगली शेख गुलाम (वय 22), अफजल ऊर्फ फावड्या राशिद खान (वय 20), शेख फयाज ऊर्फ फज्या शेख समशोद्दीन (वय 28), जाफर खान इकबाल खान (वय 21), सय्यद सलमान सय्यद कासीम (वय 23), शेख अश्‍पाक शेख असलम (वय 19, सर्व रा. तांबापुरा) यांना रात्रीतून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्या. प्रतिभा पाटील यांनी सर्वांना पोलिस कोठडी राखीव ठेवत कारागृहात रवाना केले. सरकार पक्षातर्फे ऍड. अनिल गायकवाड यांनी काम पाहिले. 

"प्रत्येकाच्या हिश्‍श्‍याला चारशे.. तर रोकड गेली कुठे?' 

जळगाव - मेहरुण तलावालगत शिवाजी उद्यानाजवळ वृद्धाची 50 हजारांत लूट केल्यानंतर मिळालेल्या पैशांत प्रत्येकाच्या हिश्‍श्‍याला चारशे रुपये आले. मग उर्वरित रक्कम गेली कुठे? अशी विचारणा केल्यावर गॅंगमधील सर्वच एकमेकांकडे पाहत होते. "गंजोटली' गॅंग म्हणून ओळख असलेल्या या संशयितांना आपल्यातील भामटा कोण याचीच जास्त चिंता अटकेनंतर झाली आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर कुणी कबूल करायला तयार नव्हते, मात्र पोलिसांनी झोडपताच त्यांनी कबुली दिली. 

मेहरुणमधील शिवाजी उद्यान, मोहाडीचा जंगलपट्‌टा, दूरदर्शन टॉवर आदी विविध ठिकाणच्या दर्गा परिसरात गांजा ओढण्यासाठी या संशयितांनी "गंजोटली गॅंग' तयार केली आहे. मेहरुणमधील तांबापुरा भागातील रहिवासी असलेले हे सर्वजण नशेत तर्रर्र झाल्यावर चोऱ्यांसाठी बाहेर पडतात. आठ महिन्यांपूर्वी अशाच गरीब रिक्षाचालकाची रिक्षा पळवून नेत घरफोड्या केल्याची घटना घडली. त्यालाही अशाच पद्धतीने रविवारी (15 जानेवारी) शिवाजी उद्यानातील दर्ग्यात गांजाची चिलम ओढून तर्रर्र झाल्यावर पुढील कार्यक्रमासाठी पैशांच्या शोधात बसलेले असतानाच अरुण सोनार सावजासारखेच त्यांच्या तावडीत सापडले. 

प्रत्येकाची हिस्सेवाटणी 
लूटमार करून मिळालेल्या पैशांत प्रामाणिकपणे हिस्सेवाटणी झाली. प्रत्येकाच्या हिश्‍श्‍याला चारशे रुपये आले. त्यानंतर जखमी वृद्धाला सोडून रिक्षातून पळून जात सर्वांनी हॉटेलमध्ये चिकन हंडीवर ताव मारला. पोलिस पथकाने काल रात्री त्यांना अटक केल्यावर चोरीस गेलेला आकडा ऐकून सर्वच एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. 

सायब..हमाराईच कोई तो बईमान! 
पोलिस निरीक्षकांनी खाक्‍या दाखवत चोरीस गेलेल्या रकमेची विचारणा केल्यावर ते हिस्सेवाटणी सांगत होते. मात्र, पन्नास हजारांचे सांगताच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सोडून देण्याचे आमिष दाखवत एकेकाला विचारणा केल्यावर चारशे रुपयांव्यतिरिक्त बाकीची रक्कम नेमकी कुणाच्या हाती लागली, ते सांगता येणार नाही. कारण जो-तो मारहाण करून खिसे तपासून जे मिळेल ते काढून घेत असल्याचे काल्याने सांगितले. विशेष म्हणजे अटकेतील संशयितांपैकी तीन जण 2003 मधील तांबापुरा दंगलीतील संशयित असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Shivaji park ganjotali Gang of molestation