शिवसेनेची शासन व महसूल विभागाच्या विरोधात घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

सटाणा : सटाणा शहर वळण रस्त्याप्रश्नी आज मंगळवाी (ता.3) सकाळी अकरा वाजता तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आल्यावर तहसील कार्यालयात निवेदन घेण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने बागलाण तालुका व सटाणा शहर शिवसेनेतर्फे शासन व महसूल विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

बागलाण तालुक्याला गेल्या दीड महिन्यांपासून तहसीलदार नसल्याने तात्पुरत्या नियुक्ती वर आलेल्या अधिकाऱ्याकडे हा पदभार दिला जात आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्ती करावी अन्यथा तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला होता. अखेर बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले आणि लवकरच कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्ती होईल तसेच शहर वळण रस्त्याप्रश्नी आपल्या मागण्याचे निवेदन वरीष्ठ पातळीवर पाठवून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिल्याने शिवसेनेने आंदोलन मागे घेतले. 

आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, मुन्ना सोनवणे, सचिन सोनवणे, राजनसिंह चौधरी, शेखर परदेशी, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: shivsena agitation against government and revenue department