भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

नाशिक : भाजप कार्यालयाबाहेरील शिवसेनेचे पोस्टर.
नाशिक : भाजप कार्यालयाबाहेरील शिवसेनेचे पोस्टर.

नाशिक - विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी येथे सांगितल्यानंतर त्याचे पडसाद आज उमटले. भल्या पहाटे भाजपच्या कार्यालयासह शहरात तीन ठिकाणी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे पोस्टर नगरसेविकेने लावल्याने स्थानिक पातळीवर युतीत ट्‌विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणाबाबत शिवसेनेकडून तत्काळ माहिती मागविण्यात आली. तर, भाजपने हे युतीत बिघाडी निर्माण करण्याचे षड्‌यंत्र असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री कोणाचा, यावरून भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर ‘आमचे ठरले आहे,’ असा निर्णय झाला असताना नाशिकमध्ये मात्र याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत वाद निर्माण केले जात आहेत. 

भाजपच्या पांडे यांनी काल मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा नारा माध्यमांसमोर दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांचे छायाचित्र असलेले आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे पोस्टर त्यांचे पती बाळा दराडे यांनी भाजप कार्यालयासमोर लावले. अन्य दोन ठिकाणीदेखील अशाच प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आली. दराडे यांनी, मी पोस्टर लावल्याचे माध्यमांना कळविल्याने यातून स्टंटबाजी देखील उघड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com