PHOTOS : महाविकास आघाडीचा प्रयोग महापालिकेत "फेल'.."झेड्‌पी'त मात्र फत्ते! 

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 2 January 2020

महाविकास आघाडीच्या महापालिकेतील सत्तेला कॉंग्रेसने "खो' घातल्याने ग्रामविकासाच्या सत्ताकारणात शिवसेना-राष्ट्रवादीचे संख्याबळ बहुमताच्या पुढे असल्याने या आघाडीतर्फे कॉंग्रेसला सोबत न घेण्याची भूमिका घेण्यात आली होती. मुळातच, कॉंग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात फूट पडत आठपैकी चार सदस्य शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याचे कारणही त्यामागे होते. मात्र महाविकास आघाडी एकत्र रहावी म्हणून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सोबत घेण्याच्या विनवणी करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांचा "रात्रीचा खेळ चालला'.

नाशिक : राज्यातील शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा प्रयोग नाशिक महापालिकेच्या सत्ताकारण "फेल' गेला होता. याचपार्श्‍वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र हा प्रयोग फत्ते झाला. शिवसेनेला अध्यक्षपद अन्‌ राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले असून या यशामध्ये राष्ट्रवादीचे ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे कॅबीनेटमंत्री दादा भुसे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. 

Image may contain: 8 people, including Mangesh Chivate and Sanjay Bhalerao, people smiling, people standing and indoor

(photos - सोमनाथ कोकरे)

अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा "रात्रीचा खेळ चालला'.

महाविकास आघाडीच्या महापालिकेतील सत्तेला कॉंग्रेसने "खो' घातल्याने ग्रामविकासाच्या सत्ताकारणात शिवसेना-राष्ट्रवादीचे संख्याबळ बहुमताच्या पुढे असल्याने या आघाडीतर्फे कॉंग्रेसला सोबत न घेण्याची भूमिका घेण्यात आली होती. मुळातच, कॉंग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात फूट पडत आठपैकी चार सदस्य शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याचे कारणही त्यामागे होते. मात्र महाविकास आघाडी एकत्र रहावी म्हणून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सोबत घेण्याच्या विनवणी करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांचा "रात्रीचा खेळ चालला'. अखेर आज इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील असल्याचे आज अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्यावर जाहीर केले.

Image may contain: outdoor

राष्ट्रवादीने अनुकुलता दर्शवल्यास यांच्या नावाचा विचार..

 भुसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनीही महाविकास आघाडी कायम असल्याचे जाहीर केले.  सकाळे यांनी शुक्रवार (ता. 3) विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसला एक जागा देण्याचा आग्रह आघाडीच्या नेत्यांकडे धरण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र समीर भुजबळ यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीविषयी यापुढील काळात चर्चा होईल, असे नमूद केले. आघाडीच्या राजकारणात कॉंग्रेसच्या वाट्याला सभापतीपद देण्यास शिवसेनेसह राष्ट्रवादीने अनुकुलता दर्शवल्यास कॉंग्रेसतर्फे गटनेते यशवंत गवळी आणि नांदगावच्या अश्‍विनी आहेर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे मानले जात आहे. राष्ट्रवादीतर्फे सभापतीपदासाठी सिद्धार्थ वनारसे, नुतन आहेर, संजय बनकर यांची नावे चर्चेत आलीत. 

Image may contain: 14 people, people smiling, indoor

भाजपचा झाला मुखभंग 
शिवसेनेमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी असलेली चुरस आणि पंचायत समित्यांच्या राजकारणात शिवसेनेने निफाड, येवला व दिंडोरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीला दाखवलेला ठेंगा या पार्श्‍वभूमीवर भाजपने सत्तेत शिरकाव करण्याची मोर्चेबांधणी केली होती. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी एकसंघ राहण्याबरोबर कॉंग्रेसने समर्थनाची भूमिका घेतल्याने भाजपचा मुखभंग झाला. भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अखेरच्या क्षणी दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. 

Image may contain: 4 people

हेही वाचा > राष्ट्रवादी काँग्रेस एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला - छगन भुजबळ

Image may contain: 4 people, including Mahesh Halwai, people standing

हेही वाचा > संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र....

हेही वाचा > रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग....​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena congress and ncp together in ZP Nashik Political Marathi News