लघुपाटबंधारे विभागात शिवसेनेचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मालेगाव - तालुक्‍यातील बोरी, अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे या धरणांतून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव तयार न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. 

पक्षाचे शहरप्रमुख रामा मिस्तरी व कैलास तिसगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हा प्रस्ताव ३० एप्रिलपर्यंत तयार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माळमाथ्यावरील बोरी, अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे या धरणांतून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. या सूचनेची दखल घेतली नाही. 

शिवसेना कार्यकर्त्यांनी लघुपाटबंधारे कार्यालयात जाऊन जाब विचारला. कार्यकारी अभियंता गुप्ता यांनी ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन संपले. आंदोलनात भारत रायते, विजय गवळी, सुनील चांगरे, प्रवीण देसले, मकबुल अहमद, भय्या म्हसदे, प्रकाश भडांगे, गुड्डू उशिरे, सुनील देवरे, खंडू उशिरे, भारत सूर्यवंशी, अनिल पवार, सोमन्ना गवळी, सुधाकर जोशी सहभागी झाले होते.

Web Title: Shivsena's movement