मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी शिवसेनेकडून गाजरांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

शहरात आज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा भाजप तर्फे आयोजित करण्यात आली आहे.
 

धुळे- शहरात आज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा भाजप तर्फे आयोजित करण्यात आली आहे.

संध्याकाळी शहरातील महाकाली मंदिराजवळील पांझरा नदी किनारी ही सभा होणार आहे. मात्र, सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभे अगोदरच धुळेकरांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची गाजरं मिळण्याअगोदर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना गाजर वाटप करीत मुख्यमंत्र्यांच्या सभेचा निषेध करण्यात आला आहे.

नागरिकांना गाजर देतांना मुख्यमंत्र्यांच्या गाजरास बळी न पडण्याचा सल्लादेखिल  युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी नागरिकांना देण्यात येत आहे.

Web Title: Shivsenas Movemnt before Chief Ministers Rally in Dhule