हंगामी भाडेवाढीत "शिवशाही'चा प्रवास स्वस्त! 

हंगामी भाडेवाढीत "शिवशाही'चा प्रवास स्वस्त! 

जळगाव - "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे. यामुळे दिवाळीत लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी शिवशाही स्लीपर कोचमधून आरामदायी प्रवास स्वस्तात करावयास मिळणार आहे. 

एसटी महामंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या हंगामात दहा टक्के भाडेवाढ करण्यात येते. यंदाच्या हंगामात 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान वीस दिवसांसाठी दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी दिवाळी सुटीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. परंतु दिवाळीत होणारी भाडेवाढ अनेकदा महामंडळाच्या पथ्यावर पडत असते आणि अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या गर्दीच्या हंगामात मिळत असते. तरी देखील महामंडळाचा हंगामी भाडेवाढीचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र यंदा भाडेवाढ करताना केवळ लालपरी आणि परिवर्तन बससाठी करण्यात आले असून, यातून "शिवशाही' बसची भाडेवाढ वगळण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com