दिव्यांगांनाही शिवशाहीतून शाही प्रवास 

दिव्यांगांनाही शिवशाहीतून शाही प्रवास 



जळगाव  : दिव्यांग बांधवांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीटदरात सवलत दिली जात होती. मात्र आता शिवशाहीच्या आसन बसमध्ये दिव्यांग बांधवांना तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे आता दिव्यांगांनाही शिवशाहीतून शाही प्रवास करता येणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून दिव्यांगसह त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशाला प्रवास भाड्यात सूट दिली जात होती. यामध्ये सुमारे 50 व 75 टक्के भाड्यांमध्ये सूट देवून त्यांच्याकडून केवळ 25 किंवा 50 टक्के भाड्याची रक्कम वसूल केली जात होती. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या साध्याबसेसमधून देण्यात येणारी ही सवलत निमआराम बसेसमध्ये देखील लागू करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यात शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देखील दिव्यांगांसह त्याच्या साथीदाराला प्रवासी भाड्यात सूट देण्यात आली असल्याची माहिती विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

शिवशाहीत मिळणार दिव्यांगांना सवलत 
शिवशाही बसमध्ये प्रवास करीत असताना दिव्यांगांसह त्यांच्यासोबत असलेल्या साथीदाराला 45 ते 70 टक्के प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना देखील शिवशाहीतून शाही प्रवास करण्याची संधी राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. 

मध्यरात्रीपासून होणार अध्यादेश 
राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीमध्ये दिव्यांगाना दिली जाणारी 50 ते 75 टक्के भाडे सवलत आता शिवशाहीमध्ये 45 ते 70 टक्के इतकी करण्यात आली असल्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाने विभाग नियंत्रकांना दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारी (ता. 6) मध्यरात्रीपासून करण्याच्या सूचना विभागनियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिल्या आहे. 

अपंगाच्या प्रमाणपत्रानुसार भाड्यात सूट 
शिवशाहीच्या आसन बसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांगासोबत असलेल्या त्याच्या साथीदाराला भाडेदरात सवलत मिळणार आहे. दिव्यांगाकडे असलेल्या अपंगाच्या प्रमाणपत्रानुसार त्याला भाडेदरात प्रवाशांना सूट दिली जाणार आहे.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com