भाजपने राजकारणासाठी रखडवले शिवस्मारक - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नाशिक - मुंबईतील अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिवस्मारक उभारण्याचा निर्णय कॉंग्रेस आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी 100 कोटींची तरतूद केली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने पुढचे काम थांबले. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान करणार असे जाहीर करण्यात आले होते; पण भारतीय जनता पक्षाने शिवस्मारकाचे काम रखडवले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील राजकारणासाठी शिवस्मारकाचे काम रखडवले काय? याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असेही आव्हान चव्हाण यांनी दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहिरातबाजी करत भाजपने खेळ केला आहे. भाजपने केलेले राजकारण खेदजनक आहे, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस भवनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

Web Title: shivsmarak stop by bjp politics