महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ती प्राध्यापिका विवाहित असून, तरुणाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून त्याने महाविद्यालयात जाऊन तिला कुंकू लावत लग्नाची मागणी घातल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक : शहरातील एका महाविद्यालयात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून थेट महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला कुंकू लावल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील केटीएमएम या महाविद्यालयात तरुणाने एकतर्फी प्रेमातून थेट जाऊन एका प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. संशयित तरुण योगेश जावळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ती प्राध्यापिका विवाहित असून, तरुणाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून त्याने महाविद्यालयात जाऊन तिला कुंकू लावत लग्नाची मागणी घातल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: In a shocking case, youth forcefully tried to marry lady professor in Nashik

टॅग्स